नवी दिल्ली 13 फेब्रुवारी : ताजिकिस्तानमध्ये शुक्रवारी रात्री तीव्र भूकंप (Earthquake News) आला, या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती, की याचे झटके दिल्लीसह उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये बसले. भूकंप विज्ञान विभागानं आधी या भूकंपाचं केंद्र पंजाबच्या अमृतसरमध्ये 19 किलोमीटर खोल असल्याचं सांगितलं होतं. मात्र, नंतर हे स्पष्ट करण्यात आलं की, भूकंप पंजाबमध्ये नाही तर ताजिकिस्तानमध्ये आला होता. विभागानं म्हटलं, की ही चूक सॉफ्टवेअमुळं झाली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं सांगितलं, की भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी होती. हा भूकंप रात्री 10 वाजून 34 मिनीटांनी आला. यात जीवितहानीची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. मात्र, या भूकंपाच्या हादऱ्यानं दिल्लीसह अन्य ठिकाणचे लोक आपल्या घराबाहेर निघाले होते. राहुल गांधी म्हणाले, पुर्ण खोलीत जाणवले हादरे - जेव्हा भूकंप आला, तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) शिकागो विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत डिजीटल पद्धतीनं संवाद साधत होते. तेव्हाच ते म्हणाले, की संपूर्ण खोली हालत आहे. याचदरम्यान नॅशनल कॉन्फरन्सचे नेता उमर अब्दुल्ला यांनीही ट्वीट केलं, की 2005 मध्ये आलेल्या भूकंपानंतर श्रीनगरमध्ये आलेल्या कोणताच हादरा इतका भयंकर आणि शक्तिशाली नव्हता. या हादऱ्यानं मला घरातून बाहेर पळण्यास भाग पाडलं. मी घरातून बाहरे पळत सुटलो आणि घाईत मी माझा मोबाईलही घरामध्ये ठेवला. त्यामुळे, जमीन हादरत असताना मी भूकंपाचं ट्वीट करू शकलो नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीचे संचालन प्रमुख जेएल गौतम म्हणाले, की भूकंपाचं केंद्र ताजिकिस्तान होतं. सुरूवातीला केंद्र अमृतसर असल्याचं समोर आलं होतं. मात्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालाचे सचिन एम राजीवन म्हणाले, की संदेश प्रणालीमध्ये चूक झाल्यानं हे झालं होतं. आता ते दुरुस्त करण्यात आलं आहे. एनसीएसनं म्हटलं, की भूकंपाचे दोन झटके आपले. ताजिकिस्तानमध्ये रात्री 10 वाजून 31 मिनीटांनी आणि अमृतसरमध्ये रात्री 10 वाजून 34 मिनीटांनी मात्र, नंतर एकच झटका बसल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.