मराठी बातम्या /बातम्या /देश /एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांना आधार देणारी हक्काची जागा, काम पाहून कराल सलाम

एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांना आधार देणारी हक्काची जागा, काम पाहून कराल सलाम

म्हातारपणी स्वतःची मुलं आधार बनावीत, हे स्वप्न प्रत्येक आई-वडिलांच असतं. पण काही जणांना एकाकी आयुष्य जगावं लागतं. त्यांच्यासाठी ही हक्काची जागा आहे.

म्हातारपणी स्वतःची मुलं आधार बनावीत, हे स्वप्न प्रत्येक आई-वडिलांच असतं. पण काही जणांना एकाकी आयुष्य जगावं लागतं. त्यांच्यासाठी ही हक्काची जागा आहे.

म्हातारपणी स्वतःची मुलं आधार बनावीत, हे स्वप्न प्रत्येक आई-वडिलांच असतं. पण काही जणांना एकाकी आयुष्य जगावं लागतं. त्यांच्यासाठी ही हक्काची जागा आहे.

 • Local18
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 16 फेब्रुवारी : म्हातारपणी स्वतःची मुलं आधार बनावीत, हे स्वप्न प्रत्येक आई-वडिलांच असतं. मात्र कधी मुलांच्या चुकीमुळे तर कधी पालकांच्या चुकीमुळे असे काही गैरसमज निर्माण होतात की, दोघेही वेगळे राहू लागतात. मुलांना पालक आवडत नाहीत, मुलं पालकांचा आदर करत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होते.

  ज्येष्ठ लोक रस्त्यावर राहतात किंवा स्वतःच्या घरात कैदी असल्यासारखं राहत असल्याची परिस्थिती अनेक घरांमध्ये दिसते. या परिस्थितीमध्ये वृद्धांसाठी चांगली काम करणारी माणसं आजही समाजात आहेत. उत्तराखंडमधील हल्दवानी शहरात बनवलेला ‘आनंद वृद्धाश्रम’ हा वृद्धांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. या वृद्धाश्रमात सध्या 17 वृद्ध राहतात.

  कसा आहे वृद्धाश्रम?

  हल्दवानीच्या रामपूर रोडवरील गोरापडाव बायपासवर आनंद वृद्धाश्रम सुरू करण्यात आलाय. सात वर्षांपासून हा आश्रम भाडोत्री इमारतीत सुरू आहे. आनंद वृद्धाश्रमाच्या संचालिका कनक चंद सांगतात की, ‘इथे वृद्धांसाठी मोफत निवास, भोजन आणि औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. इथे सर्व वृद्ध मंडळी आनंदाने एकत्र राहतात. हे सर्वजण एकत्र व्यायाम करतात, जेवतात, सायंकाळी भजन म्हणतात.’

  VIDEO : BJP नेत्याच्या गाडीनं दिली वृद्ध दाम्पत्याला धडक; घटना व्हायरल अन् पाहा काय घडलं

  कनक चंद यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, ‘मला या निमित्तानं ज्येष्ठांची सेवा करण्याची संधी मिळाली. बाबा नीम करौली यांच्या आशीर्वादानं मी हा आश्रम सुरू केलाय. सध्या या वृद्धाश्रमात 17 जण राहतात. बहुतेक ज्येष्ठ नागरिक पोलिसांच्या माध्यमातून किंवा थेट हॉस्पिटलमधून इथे आलेत. तर असे काही लोक आहेत, ज्यांच्या कुटुंबात कोणी नव्हते. आता ते इथे येऊन राहतात. इथे कौटुंबिक वातावरण आहे. इथे प्रत्येकजण एकमेकांना सहकार्य करतो. प्रत्येकजण एकमेकांसोबत आनंदाने वेळ घालवतो.’

  ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करीत असलेल्या कनक चंद यांना 2019 मध्ये ‘तेलु रौतेली’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. त्या सांगतात की, ‘मी इथे येणाऱ्या अनेक वृद्धांना त्यांच्या घरी पुन्हा पाठवलं आहे. वृद्धांच्या नातेवाईकांना आश्रमात बोलावून त्याचं समुपदेशन केलं जातं. ज्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांची किंमत समजते, ती मुलं त्यांना सोबत घेऊन जातात.’

  'ही' महिला म्हणजे माणुसकीचं प्रत्यक्ष उदाहरण; चक्क अमेरिकेतील नोकरी सोडली आणि..

  दरम्यान, सध्या नोकरीच्या निमित्ताने गावातील तरुणांचे मोठ्या प्रमाणावर शहरात, परदेशात स्थलांतर वाढले आहे. अनेकदा अशा परिस्थितीत तरुणांना त्यांच्या आई-वडिलांना नाईलाजानं गावाकडेच सोडून यावं लागतं. त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून, अनेक वृद्ध मंडळी एकाकी पडली आहेत. अशा ज्येष्ठांना आनंद वृद्धाश्रमासारखा उपक्रम आधार ठरतोय. अशा संस्थांना मदत करण्यासाठी तरुणांनीही पुढं येण्याची गरज आहे.

  First published:
  top videos

   Tags: Local18, Old man, Old woman