जाहिरात
मराठी बातम्या / देश / अखेर इस्रोच्या माजी शास्त्रज्ञांना केरळ सरकारकडून 1.3 कोटींची नुकसान भरपाई मंजूर

अखेर इस्रोच्या माजी शास्त्रज्ञांना केरळ सरकारकडून 1.3 कोटींची नुकसान भरपाई मंजूर

अखेर इस्रोच्या माजी शास्त्रज्ञांना केरळ सरकारकडून 1.3 कोटींची नुकसान भरपाई मंजूर

इस्रोचे माजी शास्रज्ञ नंबी नारायणन यांना बेकायदेशीर अटक केल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचे प्रकरण मिटवण्यासाठी केरळ सरकारने 1.3 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईला मंजुरी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

तिरुवनंतपुरम, 27 डिसेंबर : इस्रोचे माजी शास्त्रज्ञ एस नंबी नारायणन यांना 1.3 कोटी रुपयांची भरपाई देण्यास केरळ सरकारने मंजुरी दिली आहे. तिरुवनंतपुरम न्यायालयात नारायणन यांच्या बेकायदेशीर अटकेच्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिका निकालात काढण्यासाठी या नुकसान भरपाईला मंजुरी देण्यात आली आहे. नारायणन यांच्याविरोधात 1994 मध्ये हेरगिरीचा आरोप करण्यात आला होता. त्यानतंर पोलिसांनी त्यांना अटक करून छळल्याचा आरोप नारायणन यांनी केला होता. यात नारायणन यांच्या बाजूने निकाल न्यायालयाने दिला होता. बेकायदेशीर अटक केल्याप्रकरणी नंबी नारायणन यांनी दाखल केलेलं प्रकरण मिटवण्यासाठी केरळ सरकारने 1.3 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईला मंजुरी दिली आहे. नारायणन् यांच्यावर हेरगिरी केल्याच्या आणि भारताचे रॉकेट तंत्रज्ञान शत्रुराष्ट्राला विकल्याच्या आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना 1994 मध्ये अटक करण्यात आली होती. नारायणन् यांना अटक झाली तेव्हा ते ‘स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन’ तयार करण्याच्या मोहिमेत होते.

जाहिरात

नारायणन् यांच्यासह अन्य दोन शास्त्रज्ञ आणि इतर चौघांसह मालदीवच्या दोन महिलाही त्यामध्ये सामील असल्याचा आरोप होता. केरळ पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. त्याआधी त्यांना 50 दिवस कोठडीत राहावे लागले होते. सीबीआयला सर्व आरोप खोटे असल्याचे आढळल्यानंतर न्यायालयाने नंबी नारायणन् यांच्यासह सर्वांची निर्दोष मुक्तता केली. निर्दोष मुक्तका केल्यानंतरही दोन वर्षांनी केरळमधील सरकारने पुन्हा या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते, त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली तरी नारायणन् यांनी झालेला त्रास आणि अवहेलना याच्या भरपाईसाठी 1999 मध्ये याचिका दाखल केली होती. 2001 मध्ये मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नारायणन् यांना भरपाई देण्याचे आदेश केरळ सरकारला आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही भरपाईचे आदेश दिले होते. अखेर केरळ सरकारने नंबी नारायणन यांना भरपाई देण्यासाठी मंजुरी दिली आहे. VIDEO हिंसाचार पसरविणाऱ्या तुकडे तुकडे गँगला काँग्रेसची फूस, शहांचा गंभीर आरोप

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात