नवी दिल्ली, 05 जून : प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या नुपुर शर्मा (Nupur Sharma suspension from BJP ) यांच्यावर भाजपने अखेर कारवाई केली आहे. नुपुर शर्मा आणि नवीन जिंदल ( Naveen Jindal) या दोघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. भाजपच्या प्रवक्त्या असलेल्या नुपुर शर्मा आणि नवल जिंदल यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. हे विधान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. त्यानंतर आता भाजपने या दोघांवर कारवाई केली आहे. एनआयए वृत्तसंस्थेनं नुपुर शर्मा आणि नवल जिंदल यांचं निलंबन करण्यात आले असल्याची माहिती दिली.
BJP suspends Nupur Sharma and Naveen Jindal from party's primary membership pic.twitter.com/QkqkvMdLNF
— ANI (@ANI) June 5, 2022
काही वेळापूर्वीच भाजपने एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. या पत्रकामध्ये भाजप हा सर्व धर्मांचा सन्मान करतो. एखाद्या धर्माबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणे हे भाजप अजिबात खपवून घेणार नाही, या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. आमचा पक्ष कोणत्या समाजाचा किंवा धर्माचा अपमान करणाऱ्या कोणत्याही विचारधारेच्या विरोधात आहे. आम्ही अशा लोकांना आणि त्यांचा विचारांना कधीच प्रोत्साहन देत नाही, असं भाजपाचे महासचिव अरुण सिंह यांनी स्पष्ट केलं. ( PHOTO: Jio वर्ल्ड सेंटरमध्ये अरंगेत्रम करणारी राधिका मर्चंट आहे तरी कोण? ) दरम्यान, नुपुर शर्मा यांनी केलेल्या विधानामुळे भाजपवर चोहीबाजूने टीका केली जात होती. मुस्लिम संघटना आणि सौदी राष्ट्रातूनही निषेध व्यक्त केला जात होता. त्यामुळे भाजपने अखेरीस नुपुर शर्मा यांचं प्रवक्तेपदावरून निलंबन केलं आहे.