मुंबई, 13 मार्च: टाटा ग्रुपची एअरलाईन कंपनी असलेली 'एअर इंडिया' गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका मद्यधुंद प्रवाशानं एका महिला सहप्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर एअर इंडियासह इतर कंपन्यांच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांनी गैरवर्तन केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशाच एका घटनेमुळे एअर इंडिया चर्चेत आली आहे.
शुक्रवारी एअर इंडियाच्या विमानानं लंडनहून मुंबईला येणाऱ्या 37 वर्षांच्या अनिवासी भारतीयाला शनिवारी अटक करण्यात आली. विमानातील स्वच्छतागृहात धुम्रपान करताना पकडल्यानंतर आक्रमक वर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नाकर द्विवेदी, असं या प्रवाशाचं नाव असून तो यूएसमध्ये मॅनेजमेंट प्रोफेशनल आहे. त्याला शांत करण्यासाठी विमानात दोन इंजेक्शन दिली गेली कारण त्यानं विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि सहप्रवाशावर हल्ला केला होता. 'द टाइम्स ऑफ इंडिया'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.\
क्या बात है! आता विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी PhD चं बंधन नाही; UGC चा मोठा निर्णय
AI-130 फ्लाइटमधील वरिष्ठ केबिन क्रू सदस्य शिल्पा मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत सांगितलं की, प्रवासी रत्नाकर द्विवेदी स्वच्छतागृहात गेल्यानंतर काही मिनिटांतच फायर अलार्म वाजला. त्या म्हणाल्या, "स्मोक अलार्म ऐकल्यानंतर मी पायलट आणि इतर क्रू मेंबर्सना सावध केलं. आम्ही बाहेरून स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडला असता आतमध्ये द्विवेदीच्या हातात सिगारेट लायटर दिसलं. त्याला जागेवर बसण्यास सांगितल्यावर त्यानं शिवीगाळ करण्यास सुरुवात केली."
फ्लाईटमधील स्वच्छतागृहात प्रवाशानं धुम्रपान केल्याची गेल्या आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी कोलकात्याहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E-716 मध्ये एका 24 वर्षांच्या महिलेला धूम्रपान केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.
AIIMS च्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा; 2050 पर्यंत देशातील 50 टक्के तरुण जॉबसाठी होतील अनफिट?
मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, रत्नाकर द्विवेदीवर जामिनपात्र गुन्ह्याचा आरोप ठेवण्यात आला होता आणि त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्याला सोमवारी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे जिथे त्याच्यावर आरोपपत्र दाखल केलं जाईल. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. द्विवेदीबद्दल सोमवारी अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला माहिती दिली जाईल.
एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, तो मद्यधुंद अवस्थेत होता की नाही हे शोधण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. फ्लायरनं असाही दावा केला होता की, त्याच्याकडे बंदुकीची गोळी आहे. पण, त्याच्या सामानाची तपासणी केली असता काहीही आढळलं नाही. द्विवेदीनं पोलिसांना सांगितलं की, तो रॅपर बनण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईला आला आहे.
ग्रॅज्युएशन होऊन बरीच वर्ष झाली पण Interview क्लिअर होत नाही? चिंता नको; अशी क्रॅक करा मुलाखत
पायलट कॅप्टन संजय यादव यांनी क्रूकरवी द्विवेदीला शांत बसण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर तो काही वेळ शांत बसला; पण थोड्या वेळाने तो अचानक उठला आणि विमानाच्या इमर्जन्सी एक्झिटकडे गेला. त्यानं एक्झिट उघडण्याचा प्रयत्न केला. क्रू आणि इतर प्रवाशांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यानं दुसऱ्या प्रवाशाला लाथ मारली आणि शिवीगाळ केली. शेवटी त्याला जबरदस्ती करून त्याच्या जागेवर बसवण्यात आलं.
तक्रारदार क्रू मेंबरनं सांगितल्यानुसार, द्विवेदीनं डॉक्टरांना सांगितलं की तो औषधोपचार घेत आहे. आम्ही त्याच्या बॅगची तपासणी केली पण, कोणतीही औषधं आढळली नाहीत. त्याऐवजी आम्हाला ई-सिगारेट सापडली. डॉक्टरांनी त्याला शांत करण्यासाठी दोन इंजेक्शन्स दिली. एवढे करूनही तो शांत झाला नाही. शेवटी आम्हाला त्याच्या सीटवर त्याचे हात आणि पाय बांधावे लागले."
Career Tips: CBI मध्ये अधिकारी होण्यासाठी पात्रता असते तरी काय? किती मिळतो पगार? संपूर्ण माहिती
विमानाला लागलेली आग काही सेकंदात वेगानं पसरू शकते. केबिनमध्ये धुराचे लोट जमा होतात आणि विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. विमानाची उंची आणि जवळच्या विमानतळापर्यंतचं अंतर यानुसार विमान सुरक्षितपणे जमिनीवर आणण्यासाठी किमान 45 ते 60 मिनिटांचा वेळ लागतो. म्हणून, फ्लाइटमध्ये धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितलं, "रेग्युलेटरला घटनेची रितसर माहिती देण्यात आली आहे. आम्ही सध्या सुरू असलेल्या तपासात सर्व सहकार्य करत आहोत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही वर्तनासाठी कंपनी शून्य-सहिष्णुता धोरणाचं पालन करते."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Air india