मराठी बातम्या /बातम्या /करिअर /क्या बात है! आता विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी PhD चं बंधन नाही; UGC चा मोठा निर्णय

क्या बात है! आता विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी PhD चं बंधन नाही; UGC चा मोठा निर्णय

असिस्टंट प्रोफेसर पदासाठी PhD चं बंधन नाही

असिस्टंट प्रोफेसर पदासाठी PhD चं बंधन नाही

आयोगाच्या NET परीक्षेमधील व्यक्तीची पात्रता असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी पुरेशी असेल, असंही UGC नं म्हटलंय.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 मार्च: केंद्रीय विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर्सच्या पदांवर भरतीसाठी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजेच पीएचडी बंधनकारक नाही, अशी माहिती यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी दिली. उस्मानिया कॅम्पसमध्ये नव्याने बांधलेल्या UGC-HRDC इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आयोगाच्या NET परीक्षेमधील व्यक्तीची पात्रता असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी पुरेशी असेल, असंही त्यांनी म्हटलंय. या संदर्भात 'तेलंगणा टुडे'ने वृत्त दिलंय.

पीएचडी नसलेल्यांना भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्त करता यावं या साठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, विद्यापीठांमध्ये शिकवू इच्छिणाऱ्या परंतु पीएचडी पदवी नसल्यामुळे ते करू न शकणाऱ्यांना संधी देणं, हेही या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे.

Career in Acting: बॉलिवूडमध्ये तुम्हालाही HERO व्हायचंय? मग असं करता येईल करिअर

एम जगदेश कुमार म्हणाले, 'वन नेशन-वन डेटा पोर्टल विकसित केले जात आहे. ते उमेदवारांना सर्व UGC मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती देईल. पुढील शैक्षणिक वर्षापासून नॅशनल डिजिटल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलं जाईल.'

AIIMS च्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा; 2050 पर्यंत देशातील 50 टक्के तरुण जॉबसाठी होतील अनफिट?

केंद्र सरकारने या आधी आयोगाच्या नियमांमध्ये सुधारणा केली होती, ज्यामुळे असिस्टंट प्रोफेसर्सची नियुक्ती करण्यासाठी किमान पात्रता निकष पीएचडी करण्यात आला होता. ती नवीन मार्गदर्शक तत्त्वे 2021 मध्ये लागू होणार होती परंतु कोविडमुळे ती पुढे ढकलण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नंतर हा कालावधी जुलै 2023 पर्यंत वाढविण्यात आला. परंतु UGC NET स्कोअरच्या आधारावर भरती सुरू होती.

ग्रॅज्युएशन होऊन बरीच वर्ष झाली पण Interview क्लिअर होत नाही? चिंता नको; अशी क्रॅक करा मुलाखत

दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने डिसेंबर-2022 आणि जून-2023 मध्ये संयुक्त CSIR-UGC NET परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार csirnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात. शेड्युलनुसार, अर्जाची प्रक्रिया 10 एप्रिल सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील. लेट फीसह अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 23 ला रात्री 11:50 पर्यंत आहे. त्यासाठीची परीक्षा 6, 7 आणि 8 जून रोजी होणार आहे.

ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF), लेक्चररशिप (LS) आणि भारतातील विद्यापीठांमधील असिस्टंट प्रोफेसर्सच्या पदासाठी भारतीय नागरिकांची पात्रता निश्चित करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. केमिकल सायन्स, पृथ्वी, वातावरण, महासागर, प्लॅनेट्री सायन्स, लाइफ सायन्स, मॅथेमॅटिकल सायन्स आणि फिजिकल सायन्स या विषयांच्या पेपरसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी असेल.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Education, Jobs Exams