• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ना पेन्शन घेत, नाही CM चा पगार; मग कसं चालतं ममता दीदींचा खर्च, स्वत:च सांगितलं अख्खं गणित

ना पेन्शन घेत, नाही CM चा पगार; मग कसं चालतं ममता दीदींचा खर्च, स्वत:च सांगितलं अख्खं गणित

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आता सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 5 मे: तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आता सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी काही काळ त्यांनी केंद्र सरकारमध्ये कोळसा, मनुष्यबळविकास, रेल्वे, महिला-बालविकास आदी मंत्रालयांचा कार्यभार सांभाळला आहे. राष्ट्रीय पातळीवर करिष्मा असलेल्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात नसलं, तरी या वेळी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे सगळे विरोधी पक्ष ममतांच्या बाजूने उभे राहिल्यासारखं चित्र असल्यामुळे देशभरात त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. त्यांच्या साध्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचं आकर्षण मात्र देशाच्या जनतेत पूर्वीपासूनच आहे. गेली 45 वर्षं राजकारणात सक्रिय असलेल्या ममता बॅनर्जी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की गेल्या सात वर्षांत त्यांनी केंद्र सरकारकडून मिळणारं पेन्शन (Pension) घेतलेलं नाही, तसंच मुख्यमंत्री म्हणून मिळणारं वेतनही घेतलेलं नाही. मग त्यांचे वैयक्तिक खर्च त्या कसे भागवतात? 'जनसत्ता'ने याबद्दलची रोचक माहिती दिली आहे. 'अनारकलीऑफ आरा'सारख्या काही चित्रपटांचे दिग्दर्शक अविनाश दास (Avinash Das) यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. त्या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी माहिती सांगत आहेत. त्यांना केंद्राकडून सुमारे 75 हजार रुपये पेन्शन मिळतं; मात्र गेली सात वर्षं त्यांनी ते घेतलेलं नाही. एवढंच नाही, तर मुख्यमंत्री म्हणून मिळणारं वेतनही (Salary) त्या घेत नाहीत. कोणती गाडीही वापरत नाहीत. कुठे प्रवास करायचा असेल, तेव्हा त्या इकॉनॉमीक्लासनेच (Economy Class) प्रवास करतात. कुठे गेस्ट हाउसमध्ये राहायची वेळ आली, तरी त्या स्वतः पैसे खर्च करतात. सरकारी पैसा वापरत नाहीत, असं त्या स्वतः सांगतात. हे ही वाचा-आपण सर्व एकत्र आलो तर चांगला लढा देऊ'; 2024 लोकसभासाठी ममतांचा एल्गार मग त्यांचा खर्च चालतो कसा, असा प्रश्न सर्वांना पडणं साहजिक आहे. त्या शंकेचं उत्तरही ममता यांनी त्या व्हिडिओत दिलं आहे. ममता यांची आतापर्यंत 86-87 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यात अनेक बेस्टसेलर पुस्तकांचा (Bestseller Books) समावेश आहे. त्या पुस्तकांच्या विक्रीतून जी रॉयल्टी मिळते, ती आपल्यासाठी पुरेशी असते, असं त्या सांगतात. त्याशिवाय ममतादीदी काही गाणीही लिहितात. त्या माध्यमातून ही त्यांना पैसे मिळतात. शिवाय, त्यांना चित्रं काढण्याचा, रंगवण्याचा छंदही आहे. त्या चित्रांच्या विक्रीतून जे पैसे मिळतात, ते पैसे त्या दान करतात. व्हिडिओक्लिपमध्ये ममतादीदींनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंपनीला त्या गाणी लिहून देतात, त्या कंपनीकडून त्यांना वर्षाला तीन लाख रुपये मिळतात. पुस्तकांच्या विक्रीतून त्यांना वर्षाकाठी 10-11 लाख रुपये मिळतात.'एवढे पैसे सहज पुरतात, कारण मी एकटीच आहे, त्यामुळे माझा खर्च जास्त नाही,'असं त्या म्हणतात.
  First published: