कोरोनाचा व्हायरस हवेतून पसरतो? ICMRने केला मोठा खुलासा

कोरोनाचा व्हायरस हवेतून पसरतो? ICMRने केला मोठा खुलासा

कोरोनावर जगभर संशोधन सुरू असून त्यावर अजुन औषध मिळालेलं नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 05 एप्रिल : जगभर कोरोनाने थैमान घातलं आहे. तर देशातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. जगातल्या 200 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातलाय. त्यावर अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे. मात्र अजुनही औषध मिळालेलं नाही. काही कंपन्यांनी दावा केला आहे, त्यांच्या औषधांच्या चाचण्या केल्या जात आहे. त्यांचे निष्कर्ष यायला अजुन तीन-चार महिने लागण्याची शक्यता आहे. कोरोना झपाट्याने पसरत असल्याने त्याची दहशत निर्माण झालीय. त्याविषयी अनेक समज-गैरसमज पसरले आहेत. कोरोना हवेतून पसरतो का? असा प्रश्न कायम विचारला जाते. Indian Council of Medical Research म्हणजेच ICMR ने त्यावर मोठा खुलासा केला आहे.

कोरोनाचा व्हायरस हा हवेतून पसरण्याचा कुठलाही पुरावा आत्तापर्यंत मिळालेला नाही असं ICMR ने म्हटलं आहे. ICMR तज्ज्ञ हे जगभरातल्या घडामोडींवर संशोधनावर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी अभ्यासातून हा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना मोठा दिला मिळाला आहे.

देशातले कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेल्या 24 तासात 472 नवीन रूग्ण आढळून आलेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषद देण्यात आलीय. मंत्रालयातले सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. त्यामुळे रूग्णांची एकूण संख्या 3774 झाली आहे. आत्तापर्यंत 79 मृत्यू झाले असून गेल्या 24 तासांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. तर 267 जण आजारातून बरे झालेत. तर देशातल्या 274 जिल्ह्यांमध्ये कोरोना पसल्याची माहितीही त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेणार, मनमोहनसिंग आणि सोनियांना केला फोन

लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंग हे सर्वात मोठं सामाजिक औषध आहे. सरकार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचं पालन जेव्हढ्या काटेकोरपणे केलं जाईल तेवढ्या प्रमाणात कोरोनाला रोखण्यात यश मिळेलं असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

एकावेळेला 25-30 पोळ्यांचा सुरु आहे खुराक, तबलिगी सदस्यांमुळे कर्मचारी त्रस्त

भारतात 30 जानेवारी रोजी पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळून आला. त्यानंतर आता तब्बल कोरोनाची संख्या तिपटीने वाढली आहे. सुरुवातीला केवळ विदेशातून परतलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र आता हळुहळु क्लस्टर आउटब्रेक आणि संपर्कातून संक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे.

भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेने रुग्णांचा आकडा कमी दिसत असला तरी, त्यात होणारी वाढ ही भारतासाठी धोक्याची आहे. भारत अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे.

First published: April 5, 2020, 5:49 PM IST

ताज्या बातम्या