नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा हवा प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनला आहे. परिणामी दिल्ली-एनसीआरमध्ये बांधकामाशी संबंधित कामांवर बंदी घालण्यात आली आहे. येथे ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनचा स्टेज-3 लागू करण्यात आली आहे. शहरातील हवा सतत खराब होत आहे. हवेचा AQI गंभीर श्रेणीत पोहोचला आहे. मात्र, सेंट्रल व्हिस्टासारखे विशेष प्रकल्प या निर्बंधाच्या बाहेर ठेवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीआरमध्ये वीटभट्ट्या, हॉट मिक्स प्लांट, स्टोन क्रशर साइट्स, खाणकाम बंद राहणार आहे. सध्या वर्क फ्रॉम होम असणाऱ्यांना घरुनच काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. CAQM ने हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेचे कारण वाऱ्याच्या मंद गतीला आणि सतत वाढणाऱ्या पेंढ्या जाळण्याच्या घटनांना दिले आहे. CAQM चा अंदाज आहे की 30 ऑक्टोबरपर्यंत दिल्ली आणि आसपासच्या भागातील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आणि गंभीर श्रेणीत राहील. असाही अंदाज आहे की 31 ऑक्टोबरनंतर हवेची गुणवत्ता खराब होईल, जी 7 नोव्हेंबरपर्यंत तीव्र ते अत्यंत खराब श्रेणीत राहील. सरकारकडून तातडीने निर्बंध विशेष म्हणजे, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या वायु गुणवत्ता समितीने शनिवारी राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या सरकारी अधिकाऱ्यांना ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनच्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध तातडीने लागू करण्याचे निर्देश दिले. या निर्बंधांमध्ये बांधकाम आणि पाडकामाशी संबंधित कामांवर बंदी घालण्यात येणार आहे. मात्र, राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण, रेल्वे आणि मेट्रोसह इतर आवश्यक प्रकल्पांना यातून सूट देण्यात आली आहे. वाचा - आधी म्हशी, गाय अन् आता बैल; वंदे भारत ट्रेनचं पुन्हा ‘नाक कापलं’ वाहनांवरही बंदी घातली जाऊ शकते एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने सांगितले की, खराब होत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे अधिकारी NCR मध्ये BS-III पेट्रोल आणि BS-IV डिझेल चारचाकी वाहनांवर बंदी घालू शकतात. दिल्लीतील 24 तासांचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक दुपारी 4 वाजता 397 वर होता, जो जानेवारीनंतरचा सर्वात वाईट स्तर आहे. यापूर्वी दिल्लीचा हवेचा दर्जा निर्देशांक सोमवारी 312, मंगळवारी 302, बुधवारी 271 आणि गुरुवारी 354 होता.
वायू प्रदूषणची श्रेणी दिल्ली-एनसीआरमधील एअर क्वालिटी इंडेक्स चार श्रेणींमध्ये विभागला गेला आहे. शून्य ते 50 मधील AQI ‘चांगला’, 51 ते 100 ‘समाधानकारक’, 101 ते 200 ‘मध्यम’, 201 ते 300 ‘खराब’, 301 ते 400 ‘अत्यंत खराब’ आणि 401 ते 500 या दोघांमधील AQI गंभीर मानला जातो.

)







