जाहिरात
मराठी बातम्या / देश / आधी म्हशी, गाय अन् आता बैल; वंदे भारत ट्रेनचं पुन्हा 'नाक कापलं' 

आधी म्हशी, गाय अन् आता बैल; वंदे भारत ट्रेनचं पुन्हा 'नाक कापलं' 

आधी म्हशी, गाय अन् आता बैल; वंदे भारत ट्रेनचं पुन्हा 'नाक कापलं' 

दरम्यान, आज या ट्रेनचा अपघात झाल्यामुळे पुन्हा एकदा असे अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे.

  • -MIN READ Trending Desk Gujarat
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : वंदे भारत एक्स्प्रेसला सतत अपघात होत असल्याच्या घटना घडत आहेत. या ट्रेनसमोर गायी आणि म्हशी आल्यामुळे अपघात झाल्याची घटना घडून अद्याप महिनाही उलटला नाही, तोच आता पुन्हा एकदा वंदे भारत एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. मुंबईहून गांधीनगरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसने गुजरातमधल्या वलसाड इथल्या अतुल रेल्वे स्थानकाजवळ एका बैलाला धडक दिली. ही घटना आज, शनिवार (29 ऑक्टोबर 2022) रोजी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली असून, या अपघातात ट्रेनच्या पुढच्या भागाची मोडतोड झाली आहे. ‘दैनिक भास्कर’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. देशातली सर्वांत वेगवान ट्रेन म्हणून वंदे भारत एक्स्प्रेस ओळखली जाते. या ट्रेनचा आज पुन्हा अपघात झाला. मुंबईहून गांधीनगरकडे जाणाऱ्या ट्रेनची बैलाला धडक बसली. या अपघातात ट्रेनचा पुढचा भाग तुटला. काही वेळानंतर ही गाडी पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वंदे भारत एक्स्प्रेस वलसाडमधल्या अतुल रेल्वे स्टेशनवरून जात असताना सकाळी 8 वाजून 17 मिनिटांनी ही घटना घडली. या ट्रेनसमोर अचानक एक बैल आला व या बैलाला धडकल्याने गाडीचा पुढचा भाग तुटला. घटनेनंतर ट्रेन जवळपास 26 मिनिटं स्टेशनवर उभी होती. त्यानंतर ती रवाना करण्यात आली. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये वंदे भारत एक्सप्रेसचे आतापर्यंत तीन अपघात झाले आहेत. 6 ऑक्टोबर 2022 रोजी अहमदाबाद रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत एक्सप्रेसची म्हशींच्या कळपाला धडक बसली होती. या अपघातात चार म्हशींचा मृत्यू झाला होता. यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा पुढचा भाग तुटला होता. तेव्हा म्हशींचे मृतदेह रुळावरून काढल्यानंतर पुन्हा गाडी रवाना करण्यात आली होती. रेल्वे सुरक्षा दलानं या प्रकरणी म्हशींच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. Vande Bharat Train: मुंबईतून फक्त सहा तासांत गाठता येणार गुजरात! वंदे भारत ट्रेनचं वेळापत्रक जाहीर 7 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई सेंट्रल-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस गायीला धडकली होती. गांधीनगरहून जात असताना वडोदरा सेक्शनमधल्या आनंद स्टेशनजवळ गाय ट्रेनच्या समोर आली. त्या वेळी ट्रेनचा पुढच्या भागाची गायीशी टक्कर झाली. त्या वेळी ट्रेन 10 मिनिटं थांबवल्यानंतर पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आली होती. 8 ऑक्टोबर 2022 रोजी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अचानक बिघाड झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे ट्रेनची चाकं जाम झाली होती. यामुळे गाडी सुमारे 5 तास खुर्जा स्थानकावर थांबली. त्यामधल्या प्रवाशांना शताब्दी एक्स्प्रेसनं पुढील प्रवास करावा लागला. 180 च्या स्पीडमध्येही ग्लासातील पाणी साडलं नाही वंदे भारत एक्सप्रेस सेमी हायस्पीड ट्रेन स्पीड ट्रायलसाठी 24 ऑगस्ट 2022 रोजी कोटा स्टेशनवर पोहोचली होती. कोटा येथे या एक्सप्रेसच्या 6 स्पीड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये पहिली टेस्ट कोटा ते घाट का बराना, दुसरी टेस्ट घाट का बराना ते कोटा, तिसरी टेस्ट डाउन लाइनवर कुर्लासी ते रामगंज मंडी, चौथी आणि पाचवी टेस्ट कुर्लासी ते रामगंज मंडी, आणि सहावी टेस्ट रामगंज मंडी ते लबान डाउन लाइनवर घेण्यात आली. या टेस्टदरम्यान ट्रेनचा स्पीड ताशी 180 किलोमीटर होता. ट्रेनमध्ये पाण्याचा ग्लास भरून ठेवून या टेस्ट्स घेण्यात आल्या होता. मात्र 180 चा स्पीड असूनही ग्लासमधलं पाणी सांडलं नव्हतं. सुरक्षेच्या दृष्टीनं सुसज्ज ट्रेन वंदे भारत ट्रेन ही प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुसज्ज आहे. या ट्रेनला वेगळं इंजिन नाही. समोर आणि मागच्या अशा दोन्ही बाजूस लोको पायलट केबिन आहे. ट्रेनमध्ये जीपीएस प्रणाली बसवल्यामुळे तिचं लोकेशन मोबाइलवरही पाहता येतं. ट्रेनची वेळ आणि ठिकाण मोबाइल अॅपवर दाखवलं जातं. सुरक्षेच्या दृष्टीनं सीसीटीव्हीही बसवण्यात आलेत. ट्रेनमधल्या कोचची टॉयलेट्स विमानातल्या टॉयलेटप्रमाणे व्हॅक्यूम बेस्ड बायो टॉयलेट्स आहेत. यामुळे शौचालय स्वच्छ राहतं. कोचमध्ये आपत्कालीन पुश बटण असून, जे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत दाबलं जाऊ शकतं. ट्रेनमध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास चेअर ही एक आरामदायी युरोपियन शैलीची सीट आहे, जी सोनेरी, व्हायलेट आणि गुलाबी रंगात उपलब्ध आहे. या ट्रेनच्या लगेज रॅकमध्ये एलईडी डिफ्यूज दिवे आहेत. हे दिवे अनेकदा विमानात बसवले जातात. देशातली पहिली हायस्पीड ट्रेन देशातली पहिली हायस्पीड ट्रेन म्हणून वंदे भारत एक्सप्रेस ओळखली जाते. ती सध्या तीन मार्गांवर धावत आहे. दिल्ली ते वाराणसी, दिल्ली ते कटरा आणि 30 सप्टेंबर 2022 रोजी गुजरातमधील गांधीनगर ते मुंबई अशी वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू झाली आहे. ही देशातली सर्वांत वेगवान ट्रेन आहे. तिची स्पीडची मर्यादा ताशी 180 किलोमीटर आहे. येत्या काही महिन्यांत ती ताशी 200 किलोमीटर स्पीडने धावण्यास सुरुवात करेल. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यात रिक्लायनिंग सीट्स बसवण्यात आल्या आहेत. तसंच स्वयंचलित फायर सेन्सरची व्यवस्था करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सुविधेसह अपग्रेड केलेल्या ट्रेनमध्ये तीन तासांचा बॅटरी बॅकअपही आहे. दरम्यान, आज या ट्रेनचा अपघात झाल्यामुळे पुन्हा एकदा असे अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात