मराठी बातम्या /बातम्या /देश /नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने तोडले रेकॉर्ड; Delhi-Mumbai Expressway ची खासियत पाहून थक्क व्हाल

नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने तोडले रेकॉर्ड; Delhi-Mumbai Expressway ची खासियत पाहून थक्क व्हाल

हा आशियातील पहिला असा एक्‍सप्रेस-वे असेल जेथे प्राण्यांना जाण्यासाठी ओव्हरपास असतील

हा आशियातील पहिला असा एक्‍सप्रेस-वे असेल जेथे प्राण्यांना जाण्यासाठी ओव्हरपास असतील

हा आशियातील पहिला असा एक्‍सप्रेस-वे असेल जेथे प्राण्यांना जाण्यासाठी ओव्हरपास असतील

नवी दिल्ली, 23 जुलै: दिल्ली आणि मुंबईला जोडणारा तब्बल 8 लेन एक्‍सप्रेस-वे ईस्ट-वेस्ट कॉरिडोरचा एक भाग आहे. दिल्ली-मुंबई एक्‍सप्रेस-वेच्या संपूर्ण कॉरिडोरचं काम जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याचं रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं लक्ष्य आहे. हा देशातील सर्वात लांब एक्‍सप्रेस-वे  (Longest Expressway) असेल, जो तब्बल 1,350 किलोमीटर लांब आहे. (Nitin Gadkaris ambitious project breaks records You will be amazed at the uniqueness of Delhi Mumbai Expressway)

रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी ((Nitin Gadkari) यावर म्हणाले की, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेच्या एकूण 350 किलोमीटर रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालं आहे. आणि 825 किमी बांधकाम प्रगती पथावर आहे. 2020-21 मध्ये एक्‍सप्रेस-वेच्या बांधकामाची गती 36.5 किलोमीटर/ प्रति दिवस होत आहे. गडकरी पुढे म्हणाले की, आतापर्यंतच्या कोणत्याही नॅशनल हायवेचं बांधकाम इतक्या जलद गतीने झालं नाही.

देशातील सर्वात व्यस्त मार्गांना जोडणारा हा रस्ता शहर आणि राजमार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करेल. त्यामुळे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होईल आणि प्रवासासाठी खूप कमी वेळ लागेल.

हे ही वाचा-बापरे! इथे ब्रेडच्या पॅकेटसाठी द्यावे लागतात पोतं भरून पैसे; वजनावर घेतात नोटा

हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या हा देशातील सर्वात लांब एक्‍सप्रेस वेच्या निर्मितीसाठी तब्बल 90 हजार कोटी रुपयांचा निधी लागला आहे. हा आशियातील पहिला असा एक्‍सप्रेस-वे असेल जेथे प्राण्यांना जाण्यासाठी ओव्हरपास असतील. कारण हा  एक्‍सप्रेस-वे अनेक वाइल्‍डलाइफ सेंच्युरीच्या मार्गाने जाणार आहे. याशिवाय येथे 'ग्रीन एक्‍सप्रेस-वे' असेल. या एक्‍सप्रेस-वेच्या किनाऱ्यावर वृक्ष लावण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना एकत्र केलं जाईल. सोबतच मोठ्या प्रमाणात झाडं लावण्याची योजना करण्यात येणार आहे.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Mumbai, Nitin gadkari