नवी दिल्ली, 9 जुलै : पुढील वर्षी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) बोर्डाच्या परीक्षेतून धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, नागरिकत्व, नोटाबंदी आणि लोकशाही हक्कांबाबतचे विषय हटविण्यात आले आहेत. या विषयांशी संबंधित प्रकरणं आणि इतर अनेक विषय अभ्यासक्रमातून काढण्यात आले आहे. अभ्यासक्रमात या विषयासंबंधित साहित्य हटविल्यानंतरच्या विवादात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. हे वाचा- अमेरिकेसाठी चीन सर्वात मोठा धोका; ट्रम्प बड्या कारवाईच्या तयारीत ते म्हणाले की सीबीएसईच्या अभ्यासक्रमातून काही विषय हटवल्याबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. ते म्हणाले की माझी विनंती आहे की मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण आपलं काम आहे. आपण राजकारणापासून शिक्षण वेगळं ठेवायला हवं आणि राजकारण अधिक चांगल्या पातळीवर (शिक्षित) करायला हवं. रमेश पोखरियाल निशंक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या संदर्भात अनेक ट्विट केले. ते म्हणाले, ‘काही विषय सीबीएसईच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्याबाबत बर्याच असंवैधानिक टिप्पण्या झाल्या आहेत. या टिप्पण्यांमधील समस्या अशी आहे की त्यांनी खोटी गोष्टी पसरवण्यासाठी काही विषयांना जोडून खळबळ उडविली आहे.
ते म्हणाले, ‘जसे सीबीएसईने स्पष्टीकरण दिले आहे की शाळांना एनसीईआरटी पर्यायी शैक्षणिक कॅलेंडरचे अनुसरण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नमूद केलेले सर्व विषय एकाच शैक्षणिक कॅलेंडरमध्ये समाविष्ट केले आहेत. कोविड 19 साथीमुळे प्रकरणातून विषय काढले हा परीक्षेसाठी केवळ एक उपाय आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सीबीएसई अभ्यासक्रमामधून काही विषय हटविण्याबाबत चर्चा केली जात आहे. ते म्हणाले, ‘मुलांना शिक्षण देण्याचे आमचे समर्पित कार्य आहे.

)







