जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सोलापुरात कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात, मदतीऐवजी कोंबड्या पळवण्यासाठी झुंबड, Watch Video

सोलापुरात कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात, मदतीऐवजी कोंबड्या पळवण्यासाठी झुंबड, Watch Video

सोलापुरात कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात, मदतीऐवजी कोंबड्या पळवण्यासाठी झुंबड, Watch Video

धक्कादायक म्हणजे अपघातानंतर स्थानिक नागरिकांची कोंबड्या पळवण्यासाठी एक धावपळ उडाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

सोलापूर, 24 ऑक्टोबर: सोलापूरमध्ये (Solapur) कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात (Tragic Accident) झाला आहे. धक्कादायक म्हणजे अपघातानंतर स्थानिक नागरिकांची कोंबड्या पळवण्यासाठी एक धावपळ उडाली. टेम्पोमधल्या कोंबड्या घेऊन जाण्यासाठी स्थानिकांची झुंबड अपघातास्थळी दिसली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. अपघात झालेल्या टेम्पोतील सर्व कोंबड्या पळवून नेल्या आहेत. सोलापूर पुणे महामार्गावर कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झाला. पुण्याहून सोलापूर शहराकडे टेम्पो येत होता. सोलापूर शहरानजीक बाळे पुलाजवळ हा अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर मदत करण्याऐवजी परिसरातील नागरिकांनी कोंबड्या पळवण्यासाठी गर्दी केली.

जाहिरात

कसा आणि कुठे घडला अपघात रविवारी पहाटेच्या सोलापूर पुणे महामार्गावरील बाळे येथे सुमारास टेम्पोचा अपघात झाला. पुण्यावरुन सोलापूरकडे हा आयशर टेम्पो येत होता. या टेम्पोमधून कोंबड्यांची वाहतूक केली जात होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात