उन्नावमध्ये एका महिलेला जंगलात नेऊन बलात्काराचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशच्या उन्नाव इथल्या गंगाघाट विभागात एक धक्कादायक घटना घडलीय. तीन नराधमांनी एका महिलेला जबरदस्तीनं घरातून उचलून नेलं आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2018 01:29 PM IST

उन्नावमध्ये एका महिलेला जंगलात नेऊन बलात्काराचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

उन्नाव, 06 जुलै : उत्तर प्रदेशच्या उन्नाव इथल्या गंगाघाट विभागात एक धक्कादायक घटना घडलीय. तीन नराधमांनी एका महिलेला जबरदस्तीनं घरातून उचलून नेलं आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हे तीन नराधम त्या महिलेवर जबरदस्ती करू पाहतायत, आणि ती त्यांना तसं करू नका अशी विनवणी करतेय.

हा व्हिडिओ 2 महिने जुना आहे. सहजनी गावातला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आकाश नावाच्या तरुणाला अटक केलीय. बाकीच्यांचा तपास सुरू आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्या भागात महिला घाबरून गेल्यात आणि स्वत:ला असुरक्षित मानतायत.

पोलिसांनी सांगितलं आहे की पीडित महिला पुढे येऊन तक्रार नोंदवेल, तरच आम्ही काही कारवाई करू शकतो. सध्या पोलिसांनी त्या व्हिडिओच्या आधारे तीन नराधमांच्या विरोधात खटला नोंदवलाय.

काही दिवसांपूर्वी उन्नावच्या बांगरमऊ इथे राहणाऱ्या एका स्त्रीनं मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आणि भाजपचे आमदार कुलदीप सिंग सेंगर आणि त्यांच्या मित्रांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2018 01:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...