नवी दिल्ली 24 मार्च : येत्या काही दिवसात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक (Assembly Election 2021) पार पडणार आहे. मात्र, सगळ्यांचंच लक्ष पश्चिम बंगाल निवडणुकीकडे (West Bengal Assembly Election 2021) लागलं आहे. मागील दहा वर्षांपासून बंगालवर सत्ता असणाऱ्या ममता बॅनर्जींचं (CM Mamata Banerjee) सरकार कोसळावं यासाठी भाजप (BJP in West Bengal) पूर्ण प्रयत्न करत आहे. पक्षानं प्रचारासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी उतरवलं आहे. भाजपच्या का प्रयत्नांचा परिणामही बंगालमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालसाठी घेण्यात आलेल्या नव्या ऑपिनियन पोलनुसार (Bengal Opinion Poll), बंगालमध्ये भाजप मोठा फेरपालट करताना दिसत आहे. मागील काही रिपोर्टमध्ये भाजप 100 जागांवर विजय मिळवेल अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, नवीन सर्व्हेनुसार भाजप तृणमूलच्या जवळ पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे या सर्व्हेनुसार यावेळी टीएमसी बहुमतापासून लांब असल्याचं पाहायला मिळत आहे.
पश्चिम बंगालसाठी केला गेलेला ओपिनियन पोल नुकताच समोर आला आहे. एबीपी आणि सीएनएक्सनं केलेल्या या सर्व्हेनुसार बंगालमध्ये यावेळी भाजपला 130 ते 140 जागांवर विजय मिळू शकतो. आधीच्या ओपिनियन पोलमध्ये ही संख्या खूप कमी दाखवली गेली होती. मात्र, आता भाजप टीएमसीच्या भरपूर जवळ गेलं आहे. ओपिनियन पोलनुसार, टीएमसीला राज्यात 136-146 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेस आणि डाव्या पक्षांना राज्यात 14-18 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतर पक्षांना दोन ते तीन जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. यात कोणत्याही पक्षाला विजयासाठी कमीत कमी 148 जागांची गरज आहे. अशात एबीपीनं केलेल्या या ओपिनियन पोलमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याचं दिसत आहे. एबीपी आणि सर्व्हे एजन्सीचा असा दावा आहे, की यासाठी त्यांनी 149 जागांवरील 11 हजार 920 लोकांसोबत बातचीत करुन हा सर्व्हे मांडला आहे. हा सर्व्हे 12 ते 21 मार्चदरम्यान करण्यात आला आहे. याआधी बंगालमध्ये 2016 मध्ये विधानसभा निवडणूक पार पडली होती. यावेळी ममतांच्या टीएमसीला 211 जागांवर विजय मिळाला होता. तर, भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. डाव्या पक्षांना 26 तर काँग्रेसला 44 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, यावेळी भाजपचा डाव चांगलाच साधून मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, Mamata banerjee, West Bengal bjp, West Bengal Election