नवी दिल्ली, 09 सप्टेंबर: दिल्ली (Delhi Police) पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ज्यानं आपल्या आईची हत्या केली आहे. दिल्ली पोलिसांच्या आउटर डिस्ट्रिक्टच्या मुंडका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबरला मुंडका पोलीस स्टेशनला जवळपास 8.30 वाजता एका महिलेच्या डोक्याला गोळी लागली असून अम्बुलन्सची आवश्यकता असण्यासंदर्भात एक पीसीआर कॉल आला होता. घटनेची माहिती मिळताचा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर पोलिसांनी पाहिलं की, जखमी अवस्थेत महिला दिसली. तसंच काही रिकामी आणि जिवंत काडतुसे सोबत देशी बनावटीचे पिस्तूल, एक डमी पिस्तूलही आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तेव्हा जखमी महिलेचं नाव रोशनी असल्याचं समजलं. जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमी अवस्थेत दाखल केलेल्या महिलेचा 6 सप्टेंबरला मृत्यू झाला. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, हे कृत्य महिलेच्या मुलानंच केलं असून त्या घटनेनंतर तो फरार आहे. तालिबानच्या क्रूरतेचं आणखी एक ज्वलंत उदाहरण, पत्रकारांना निर्दयपणे मारहाण 400 लोकांची चौकशी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या टीमने आरोपीला पकडण्यासाठी 100 पेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकले आणि सुमारे 400 लोकांची चौकशी केली. याशिवाय सुमारे 150 सीसीटीव्ही कॅमेरेही तपासण्यात आले. जवळपास 8 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आरोपी संदीपला पोलिसांनी अटक केली. दारू पिण्यावरुन आईनं खडसावलं, रागाच्या भरात झाडल्या गोळ्या पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी संदीपने खुलासा केला की, 2013 मध्ये लग्न केलं होतं. त्याला 5 वर्षांची मुलगी आहे. दरम्यान पती -पत्नीमध्ये वाद होऊ लागले. ज्यामुळे संदीपची पत्नी तिच्या माहेरी निघून गेली. संदीप सुरुवातीला ड्रायव्हरचा काम करत होता. मात्र त्यानं नोकरी सोडली आणि त्याला दारु पिण्याचं व्यसन लागलं. ज्यामुळे संदीप आणि त्याच्या आईमध्ये दररोज वाद व्हायचे. मुलांची काळजी घ्या, पुढच्या महिन्यात Corona ची तिसरी लाट निश्चित? घटनेच्या रात्रीही दोघांमध्ये त्याच कारणानं वाद झाला, ज्यामुळे आरोपी संदीपनं त्याच्या आईवर गोळीबार केला. गोळी पीडितेच्या गळ्याला लागली. नंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.