नवी दिल्ली, 09 सप्टेंबर: COVID-19 Pandemic: देशात संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबरमध्ये (October) देशात कोरोनाची तिसरी लाट ( Third wave of Corona) येण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने (NIDM) एक अहवाल तयार केला आहे. ज्यात ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. या अहवालात तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांबाबत अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, जर देशात लसीकरणाचा वेग आणखी वाढवला नाही तर तिसऱ्या लाटेत संक्रमित लोकांची संख्या दररोज 6 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आनंदाची बातमी! नाकाद्वारे देणाऱ्या नेजल व्हॅक्सिनची लवकरच क्लिनिकल ट्रायल हा अहवाल NIDM ने तज्ज्ञांशी बोलल्यानंतर तयार केला आहे आणि त्यात कोरोनाच्या प्रसाराशी संबंधित पैलू आणि प्रतिबंधक उपायांबद्दल सांगण्यात आलं आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांबद्दल अधिक काळजी घेण्याची गरज आहे आणि मुलांना प्राधान्याने लस लागू करण्यावर भर द्यावा लागेल, असं अहवालात म्हटलं आहे. तसंच इतर आजारांनी ग्रस्त मुलांना प्राधान्य द्यावं लागेल. तसेच शिक्षक, शालेय कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक करावे लागेल, असंही सांगण्यात आलं आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी रुग्णालयानं अलर्ट मोडमध्ये असावं असंही अहवालात आहे. यामध्ये असे म्हटले आहे की जर मुलाला संसर्ग झाला असेल तर पालकांची रुग्णालयात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. या अहवालात मुलांचं लसीकरण करताना घ्यावयाच्या अतिरिक्त खबरदारीचा सल्लाही देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.