मराठी बातम्या /बातम्या /देश /Big News: विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये झाडाला लटकलेला मृतदेह सापडला, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी

Big News: विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये झाडाला लटकलेला मृतदेह सापडला, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी

शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली की, जेएनयू कॅम्पसमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेला आहे.

शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली की, जेएनयू कॅम्पसमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेला आहे.

शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली की, जेएनयू कॅम्पसमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेला आहे.

नवी दिल्ली, 04 जून: जेएनयू कॅम्पसमध्ये (JNU campus) एका झाडाला लटकलेला मृतदेह सापडला आहे. या घटनेबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी तणावाचे वातावरण असून पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पोलिसांना जेएनयूमधून (JNU) संध्याकाळी 6.30 च्या सुमारास फोन आला. माहिती मिळताच तात्काळ पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.

शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली की, जेएनयू कॅम्पसमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेला आहे. माहिती मिळताच वसंत कुंज पोलीस स्टेशनचे एसएचओ टीमसोबत जेएनयू कॅम्पसच्या जंगलात पोहोचले. या ठिकाणी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. म्हणजेच मृतदेह खूप दिवसांपूर्वीचा होता. या व्यक्तीने आत्महत्या केली आहे की खून केल्यानंतर मृतदेह लटकवण्यात आला आहे, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असण्याची शक्यता आहे.

Kashmir मध्ये 24 तासांत तिसरा दहशतवादी हल्ला, मजुरांवर ग्रेनेड हल्ला; दोन जखमी

रात्री उशिरापर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. दिल्ली पोलिसांची टीम घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करून तपास करत आहे. यासोबतच हा मृतदेह विद्यार्थी, प्राध्यापक की बाहेरील व्यक्तीचा आहे, याचाही शोध घेतला जात आहे.

याआधीही जेएनयू अनेक प्रसंगी वादात सापडले आहे. तेथे अनेक निदर्शने झाली, हिंसक घटनाही घडल्या. मात्र झाडाला लटकलेला मृतदेह आढळल्याने सर्वच चिंतेत सापडले आहेत. या घटनेवर व्हीसीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिसही तपासानंतरच काही सांगू शकतील. सध्या घटनास्थळी मृतदेहाची तपासणी करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी कॅम्पसमध्ये विनयभंगाची प्रकरणे समोर आली होती

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात यापूर्वी लैंगिक छळाच्या दोन घटनांनी संपूर्ण जेएनयू परिसर हादरला होता. काही दिवसांपूर्वी, डाव्या संघटना AISA च्या कार्यकर्त्याने कॅम्पसमधील चंद्रभागा वसतिगृहाच्या टेरेसवर जेएनयूच्या एका विद्यार्थ्याचे शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. दुसर्‍या एका घटनेत, एनएसयूआयशी संलग्न असलेल्या एका भाषा शाळेतील एका चीनी भाषेतील विद्यार्थ्याने ईशान्य भारतातील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.

First published:

Tags: JNU