श्रीनगर, 04 जून: काश्मीरमध्ये (Kashmir) परप्रांतीयांना सातत्यानं लक्ष्य केलं जात आहे. 26 दिवसांत टार्गेट किलिंगच्या 10 घटना घडल्या असून आता दक्षिण काश्मीरच्या (South Kashmir) शोपियानमध्ये (Shopian) दहशतवाद्यांनी स्थलांतरित मजुरांना लक्ष्य केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी (Terrorists) कामगारांवर ग्रेनेड फेकले. यामध्ये दोन मजूर जखमी झाले आहेत. या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं मजूर जखमी झाल्याची माहिती सुरुवातीला समोर येत होती. मात्र पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट केलं आहे. सिलिंडरचा स्फोट झाला नाही. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियानच्या आगलार झैनापोरा भागात दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला, ज्यामध्ये दोन प्रवासी मजूर जखमी झाले. परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.
#Terrorists lobbed a #grenade at Aglar Zainapora, area of #Shopian, resulting in minor injuries to 02 outside labourers. Area has been cordoned off. Further details shall follow.@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) June 3, 2022
या स्फोटात दोन प्रवासी मजूर गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट होताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तपास केला. दहशतवाद्यांनी परप्रांतीयांवर ग्रेनेडनं हल्ला केल्याचं तपासात समोर आलं आहे. यामध्ये दोन मजूर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. बडगाममध्ये दोन परप्रांतीय मजुरांवर गोळीबार, एकाचा मृत्यू गुरुवारी बडगाममध्ये (Budgam) वीटभट्टीवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर हल्ला झाला, ज्यामध्ये 1 कामगाराचा मृत्यू झाला. तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमी मजुरावर श्रीनगरच्या SMHS रुग्णालयात (SMHS Hospital, Srinagar) उपचार सुरू आहेत. बडगाम मगरेपोरा चडूरा भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या मजुराचे नाव दिलखुश असल्याचे सांगण्यात येत आहे. तो बिहारचा रहिवासी होता. दुसरीकडे, राजन असे दुसऱ्या मजुराचे नाव असून, तो पंजाबचा रहिवासी आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गैर-काश्मिरी किंवा हिंदू नागरिकांची निवडक हत्या केली जात आहे. बँक मॅनेजरची हत्या कुलगाम जिल्ह्यात (Kulgam District) गुरुवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी दुसऱ्या राज्यातील एका बँक कर्मचाऱ्यावर हल्ला केला. गोळी लागल्याने बँक मॅनेजर (Bank Manager) जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याआधी मंगळवारीच कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका हिंदू महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली होती. गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरवर गोळीबार केला. या हल्ल्यात बँक व्यवस्थापक विजय कुमार यांचा मृत्यू झाला. विजय कुमार हा राजस्थानचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. विजय कुमार हे कुलगाममधील मोहनपोरा येथील स्थानिक ग्रामीण बँकेत तैनात होते. दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तो राजस्थानमधील हनुमानगडचा रहिवासी होता. खोऱ्यातील हत्या थांबत नाहीत 31 मे- कुलगाममधील गोपालपोरा येथे दहशतवाद्यांनी एका हिंदू शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. 25 मे 2022 - काश्मिरी टीव्ही कलाकार अमीरा भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या. 24 मे 2022- दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात सात वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. 17 मे 2022 - बारामुल्ला येथील एका वाईन शॉपवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात रणजित सिंह यांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. 12 मे 2022 - काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची बडगाममध्ये गोळ्या झाडून हत्या. दहशतवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला. 12 मे 2022- पुलवामा येथे पोलीस शिपाई रियाझ अहमद ठाकोर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 9 मे 2022 - शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक ठार. यात एका जवानासह दोघे जखमी झाले. 2 मार्च 2022- कुलगाममधील संदू येथे दहशतवाद्यांनी पंचायत सदस्याची गोळ्या घालून हत्या केली.

)







