मराठी बातम्या /बातम्या /देश /EX Girlfriend वर भर रस्त्यात वार, हल्ला करतानाचा Live Video समोर

EX Girlfriend वर भर रस्त्यात वार, हल्ला करतानाचा Live Video समोर

दिल्लीत एका वेड्या प्रियकरानं एक्स गर्लफ्रेंडवर चाकूनं हल्ला केला (Lover Attacks On Girl)आहे.

दिल्लीत एका वेड्या प्रियकरानं एक्स गर्लफ्रेंडवर चाकूनं हल्ला केला (Lover Attacks On Girl)आहे.

दिल्लीत एका वेड्या प्रियकरानं एक्स गर्लफ्रेंडवर चाकूनं हल्ला केला (Lover Attacks On Girl)आहे.

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये एक भयानक घटना घडली आहे. दिल्लीत एका वेड्या प्रियकरानं एक्स गर्लफ्रेंडवर चाकूनं हल्ला केला (Lover Attacks On Girl)आहे. या हल्ल्यात गर्लफ्रेंड गंभीर जखमी झाली आणि नंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

आरोपीची EX Girlfriend वर हल्ला

19 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा दिल्लीच्या बिंदापूरमध्ये ही घटना घडली. मुलीवर चाकूनं हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. अंकित असं आरोपीचं नाव आहे. पीडित मुलगी आरोपीची एक्स-गर्लफ्रेंड होती.

झी न्यूज हिंदीनं या संदर्भातला सीसीटीव्ही फुटेज शेअर केलं आहे.

वारंवार चाकूचे वार

या भयानक घटनेत 3 मुलेही दिसत आहेत. अचानक गोंधळ झाला आणि एक मुलगा मुलीवर चाकूनं सपासप वार करत असल्याचं दिसलं. यानंतर मुलगी जमिनीवर पडते. मात्र त्यानंतर मुलगा मुलीचे केस हातात धरून तिच्यावर सपासप वार करत राहतो.

हेही वाचा- विजेचा शॉक देत पत्नीची केली भयंकर अवस्था; दुसऱ्या बायकोच्या मदतीनं नवऱ्यानं गाठला क्रूरतेचा कळस

दोन मुले पीडितेला करतात वाचवण्याचा प्रयत्न

सीसीटीव्हीमध्ये दिसणारी दोन मुले आरोपी मुलाला हल्ला करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हल्ला करणारा मुलगा सतत तिच्यावर वार करताना दिसत आहे. दुसरीकडे, दुसरा मुलगा शांतपणे संपूर्ण घटना पाहत उभा आहे. नंतर, मुलगी जखमी अवस्थेत आणि रडत उभ्या असलेल्या मुलाकडे जाते. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित नावाच्या मुलानं मुलीवर हल्ला केला आहे जो तिचा Ex Boyfriend आहे.

काय आहे नेमकी घटना

आरोपी अंकितनं आपल्या एक्स (Called her to meet and killed her) गर्लफ्रेंडला भेटायला बाहेर बोलावलं. ती समोर येताच तिच्यावर चाकूचे वार केले. ही खळबळजनक घटना घडली दिल्लीतील द्वारका जिल्ह्यात. या परिसरात राहणाऱ्या डॉली नावाच्या तरुणीचं अंकित गाबा नावाच्या तरुणासोबत काही महिन्यांपूर्वी अफेअर होतं. मात्र त्यानंतर त्यांच्यात भांडणं होऊन दोघांनी ब्रेकअप केलं होतं.

हेही वाचा- शोपियानमध्ये पुन्हा लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

या गोष्टीचा राग अंकितच्या मनात होता. त्यानं डॉलीला धडा शिकवायचं ठरवलं. एक दिवस काही महत्त्वाचं बोलायचं असल्याचं सांगून त्यानं डॉलीला बाहेर बोलावलं. अंकितसोबत त्याचे दोन मित्र हिमांशु आणि मनीष हेदेखील होते. डॉलीवर अंकितनं चाकूचे सात वार केले.

First published:
top videos

    Tags: Crime news, Delhi