ना आई ना नातलग; बापाच्या मृतदेहासमोर एकटा बसून होता 10 वर्षांचा चिमुरडा

ना आई ना नातलग; बापाच्या मृतदेहासमोर एकटा बसून होता 10 वर्षांचा चिमुरडा

कोरोनाचा कहर इतका आहे की 10 वर्षांच्या या लहानग्याच्या मदतीला कोणीच येत नव्हतं. अखेर...

  • Share this:

चेन्नई, 10 मे : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) विविध परिस्थितीत मृत्यूचं सत्र सुरू आहे. मात्र 10 वर्षांच्या या लहानग्याचं दु:ख पाहून तुमचे डोळे भरुन येतील. घरात आई नाही, आजीही नाही. आहे फक्त वडिलांचा मृतदेह.

5 वीत शिकणारा हा लहानगा मदतीची वाट पाहत बसून होता. मात्र कोरोनाच्या भीतीने कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे येत नव्हतं, हे दुर्देव आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार ही घटना तामिळनाडूमधील विल्लुपुरम जिल्ह्यातील आहे. दोन महिन्यांपूर्वी एका अपघातात जखमी झालेले या मुलाचे वडील अयान्नार रुग्णालयात भरती होते. त्यांची पत्नी धनम आणि आई मुनिम्मल त्यांची काळजी घेत होते. अधिकतर वेळ त्या रुग्णालयातच बसून राहायच्या. यादरम्यान कोरोनाची साथ आल्याने त्या दोघींना रुग्णालय प्रशासनाने घरी थांबण्याचा सल्ला दिला. मात्र काही दिवसात त्या दोघींची तब्येत बिघडली आणि दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे दोघींनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यादरम्यान अयान्नार यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला. वडिलांचा मृतदेह घरी आणला मात्र त्यापुढे काय करावं हे त्या जीवाला कळेना. त्यानंतर जीवा वडिलांच्या मृतदेहासमोर आई आणि आजीची वाट पाहत बसून होता.

अय्यान्नार यांच्या मृत्यूची बातमी कळताच धनम आणि मुनिम्मल यांनी रुग्णालयाकडून घरी जाण्याची परवानगी मागितली. अखेर या मुलाची आई व आजी अंत्यसंस्कारासाठी घरी आले. कोरोनामुळे येथे योग्य ती काळजी घेतली गेली होती. अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्यांना प्रोटेक्टिव्ह ड्रेस देण्यात आला होता. सध्या जीवाला त्याचे वडील अय्यानार यांच्या भावाकडे ठेवण्यात आलं आहे. शिवाय प्रशासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे.

संबंधित-मजुरांच्या मृत्यूचं सत्र थांबेना, उष्णतेमुळे 3 जणांनी वाटेतच गमावला जीव

चालत निघालेल्या व्यक्तीचा वाटेतच झालं असं की घरीही पोहोचू शकलं नाही पार्थिव!

 

First published: May 10, 2020, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading