जाहिरात
मराठी बातम्या / देश / Nehru Memorial Museum And Library : मोदी सरकारकडून आणखी एका संस्थेचं नामांतर; काँग्रेस आक्रमक, म्हणाले..

Nehru Memorial Museum And Library : मोदी सरकारकडून आणखी एका संस्थेचं नामांतर; काँग्रेस आक्रमक, म्हणाले..

आणखी एका संस्थेचं नामांतर

आणखी एका संस्थेचं नामांतर

Nehru Memorial Museum And Library : नवी दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलण्यात आले आहे. आता ते पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय म्हणून ओळखले जाईल. नेहरू स्मारकाच्या नामांतरावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

  • -MIN READ Trending Desk Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 16 जून : शहरं, स्टेशन्स आणि काही वास्तुंची नावं बदलण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. यात आता नवी दिल्लीतील नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीची भर पडली आहे. केंद्रातील मोदी सरकारने या संस्थेचं नाव बदललं आहे. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या म्युझियमचे नवीन नाव आणि त्यावरुन सुरू झालेली टीका-टिप्पणी नेमकी काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया. `आज तक`ने या विषयीचे वृत्त दिले आहे. नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव बदलणार? नवी दिल्ली येथील नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव आता बदलण्यात आलं आहे. ही संस्था आता पंतप्रधान वस्तुसंग्रहालय आणि ग्रंथालय म्हणून ओळखली जाणार आहे. नेहरु मेमोरियलचं नाव बदलल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीच्या एका विशेष बैठकीत याचं नाव बदलून पंतप्रधान वस्तुसंग्रहालय आणि ग्रंथालय करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि म्युझियमचे उपाध्यक्ष राजनाथ सिंह होते. या संस्थेच्या नावातून स्वतंत्र भारतातील लोकशाहीचा एकत्रित प्रवास आणि राष्ट्र उभारणीत प्रत्येक पंतप्रधानाचं योगदान दर्शवणाऱ्या नवीन संग्रहालयासह सध्याच्या उपक्रमांचे प्रतिबिंब त्यात दिसावे, असं कार्यकारी परिषदेला वाटलं. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आता हे संग्रहालय अपडेट करण्यात आलं आहे. संग्रहालयाची सुरुवात नूतनीकरण केलेल्या नाविन्यपूर्ण नेहरू संग्रहालय भवनापासून होते. या भवनात जवाहरलाल नेहरूंचे जीवनकार्य आणि योगदानाविषयी माहिती पाहायला मिळते. हे भवन तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि पूर्णपणे अपडेट करण्यात आलं आहे. वाचा - Sharad Pawar : शरद पवारांबद्दल वादग्रस्त ट्वीट करणारा सौरभ अखेर आला समोर, केला भलताच दावा नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचे नाव बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये रमेश यांनी म्हटलं आहे की, ``मोदी हे संकुचित वृत्तीचे आणि सूडबुद्धीचे दुसरे नाव आहे. 59 वर्षांहून अधिक काळ, नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी हे जागतिक बौद्धिक ऐतिहासिक स्थळ, पुस्तकं आणि नोंदीचा खजिना आहे. आता ते पंतप्रधान संग्रहालय आणि सोसायटी म्हणून ओळखलं जाईल. भारतीय राष्ट्र-राज्य शिल्पकाराचं नाव आणि वारसा बदनाम करण्यासाठी, अपमानित करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदी काहीही करु शकतात. आपल्या असुरक्षिततेच्या ओझ्याखाली दबलेला एक छोटा माणूस स्वयंघोषित विश्वगुरु म्हणून फिरत आहे.`` दरम्यान, 2016 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सर्व पंतप्रधानांना समर्पित असलेले एक संग्रहालय तीन मूर्ती संकुलात उभारण्याची कल्पना मांडली होती. एनएमएमएलच्या कार्यकारी परिषदेने 25 नोव्हेंबर 2016 रोजी 162 व्या बैठकीत याला मान्यता दिली. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून, 21 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान संग्रहालय लोकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात