Home /News /national /

Covid-19 च्या लसीचा बूस्टर डोस घ्यावा लागणार? आज होणार फैसला

Covid-19 च्या लसीचा बूस्टर डोस घ्यावा लागणार? आज होणार फैसला

आरोग्य प्रशासन सतर्क असून आता कोरोना व्हायरसविरुद्ध प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता असल्याची मागणी होऊ लागली आहे.

  नवी दिल्ली, 10 डिसेंबर: सध्या आटोक्यात आलेल्या कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती चिंताजनक झाली आहे. आरोग्य प्रशासन सतर्क असून आता कोरोना व्हायरसविरुद्ध प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता असल्याची मागणी होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) अंतर्गत विषय तज्ज्ञ समिती (SEC)आज कोविड-19 बूस्टर डोस (Covid-19 Booster Shot)संदर्भात पहिली बैठक घेणार आहे. अधिकृत सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. अलीकडेच, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) कोविशील्डच्या (Covishield)बूस्टर डोसच्या मंजुरीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे अर्ज दाखल केला आहे. आज होणाऱ्या बैठकीत याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. हेही वाचा-  नागपुरात काँग्रेसच्या गोटात कमालीच्या घडामोडी, मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना थेट उमेदवार बदलला
   सीरम इन्स्टिट्यूटचे म्हणणे आहे की देशात सध्या कोविड लसीचा पुरेसा साठा आहे आणि नवीन कोरोना व्हायरसचा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे (Omicron variant)बूस्टर डोसची मागणी होत आहे.
  सीरम इन्स्टिट्यूट ही भारतातील पहिली लस उत्पादक कंपनी आहे जिने बूस्टर डोस म्हणून Covishield च्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. यासंदर्भात एसईसीची बैठक आज दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. अनेक तज्ज्ञांनी विशेषत: नवीन अत्यंत संसर्गजन्य COVID-19 चा व्हेरिएंट Omicron आढळून आल्यानंतर भारतात बूस्टर डोसची शिफारस केली आहे. मात्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान अलीकडेच भारतातील लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटानं (NTAGI) भारतातील कोविड-19 लसींच्या अतिरिक्त डोसबाबत एक बैठकही घेतली, मात्र या विषयावर कोणतेही एकमत होऊ शकले नाही. दरम्यान, SII ने यावर्षी जानेवारीपासून कोविशील्ड लस पाठवण्यास सुरुवात केली आहे आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक अब्ज डोसचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत देशात एकूण 114.78 कोटी कोविडशील्ड लस देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारताच्या एकत्रित लसीकरण कव्हरेजनं गुरुवारी 131 कोटींचा टप्पा ओलांडला. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 67 लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. हेही वाचा-  Big News: आंतरराष्ट्रीय विमानसेवा आता 31 जानेवारीपर्यंत बंद, केंद्र सरकारची मोठी घोषणा
   त्याच वेळी, सीरम (Serum Institute of India) इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी कोविशील्ड लसीचे (Covishield vaccine)उत्पादन किमान 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितलं की, फार्मास्युटिकल फर्मकडे कोविड-19 लसीसाठी केंद्राकडून कोणतेही आदेश नाहीत. आम्ही विविध आफ्रिकन नेत्यांच्या संपर्कात आहोत. सध्या, आम्ही भारत सरकार लसींच्या निर्यातीबाबत योग्य सूचना देईल याची वाट पाहत आहोत.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus

  पुढील बातम्या