Home /News /national /

Big News: आंतरराष्ट्रीय विमानसेवा आता 31 जानेवारीपर्यंत बंद, केंद्र सरकारची मोठी घोषणा

Big News: आंतरराष्ट्रीय विमानसेवा आता 31 जानेवारीपर्यंत बंद, केंद्र सरकारची मोठी घोषणा

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत.

    नवी दिल्ली, 9 डिसेंबर: जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रभाव वाढत असताना केंद्र सरकारनं (Central Government) आंतरराष्ट्रीय विमानसेवा (International air service) आणखी काही काळ स्थगित (suspended) करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सिव्हिल एव्हिएशननं काढलेल्या ताज्या आदेशांनुसार आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार भारतात येणाऱ्या आणि भारतातून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांना स्थगिती देत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. काय आहे निर्णय? जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. भारतातही त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर एका देशातून दुसऱ्या देशात हा व्हेरिएंट पसरू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित कऱण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.  नव्या निर्णयानुसार आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित ठेवली जाणार आहे. त्यानंतर कोरोनाची जागतिक परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकारनं तातडीचा हा आदेश काढल्यामुळे भारतात येणाऱ्या आणि भारतातून परदेशात जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांना आता त्यांचं नियोजन बदलावं लागणार आहे. काही अपवादांना परवानगी प्रवासी विमानसेवेसाठी केंद्र सरकारनं काढलेला हा नवा आदेश लागू असला तरी कार्गो सेवा मात्र पूर्ववत सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणं काही खास विमानफेऱ्यांना परवानगी देण्यात येऊ शकते, असं या आदेशात म्हटलं आहे. मात्र त्यासाठी DGCA ची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. ज्या विमानांच्या फेऱ्यांचं अगोदरच बुकिंग झालं आहे, त्यांना विशिष्ट अटीवर प्रवासाची परवानगी दिली जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र ही परवानगी सरसकट सर्व फेऱ्यांसाठी नसून प्रत्येक फेरीबाबत स्वतंत्रपणे निकष तपासून निर्णय घेतला जाणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Airplane, India, International, Travel

    पुढील बातम्या