Home /News /national /

बड्या टीव्ही चॅनेलचे रिपोर्टर कमल खान यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

बड्या टीव्ही चॅनेलचे रिपोर्टर कमल खान यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

एक दुखद बातमी समोर येत आहे. बड्या टीव्ही चॅनेलचे रिपोर्टर कमल खान यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं कमल खान यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

    नवी दिल्ली, 14 जानेवारी: एक दुखद बातमी समोर येत आहे. बड्या टीव्ही चॅनेलचे रिपोर्टर कमल खान (Kamal Khan) यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं कमल खान (heart attack) यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या NDTV वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक म्हणून काम करत होते.  त्यांना रामनाथ गोएंका पुरस्कारानं ही सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच भारताच्या राष्ट्रपतींकडून कमल खान यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारही मिळाला आहे. लखनऊच्या बटलर पॅलेस कॉलनीत राहणारे खान दीर्घकाळ टीव्ही पत्रकारितेत काम करत होते. बातमी सादर करण्याच्या त्यांच्या शैलीचे देशभरात कौतुक व्हायचं. मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केला शोक कमल खान यांच्या निधनावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. सीएम योगी म्हणाले की, मी शोकाकुल कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. हे पत्रकारितेचे कधीही न भरून येणारे नुकसान आहे. कमल हे निःपक्षपाती पत्रकारितेचे चौथे स्तंभ आणि भक्कम पहारेकरी होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. आजतकचे पत्रकार आणि अँकर रोहित सरदाना यांचंही निधन  गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात  पत्रकार आणि 'आज तक'चा  अँकर रोहित सरदाना यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. निधनापूर्वी रोहित यांना कोरोनाची लागण झाली होती. पण रोहित कोरोनामुक्त झाले होते. कुरुक्षेत्र, हरियाणा येथील रोहित यांना NT पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अँकरसाठी ENBA पुरस्कार तसेच हिंदी पत्रकारितेसाठी प्रतिष्ठित गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कार मिळाले होते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Reporter

    पुढील बातम्या