मराठी बातम्या /बातम्या /देश /'मिशन 2019' मोदींच्याच नेतृत्वाखाली !,एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब

'मिशन 2019' मोदींच्याच नेतृत्वाखाली !,एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब

देशभरातले राजकीय प्रश्न आणि 2019 ची निवडणूक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढवण्यावर शिक्कामोर्तब झालं

देशभरातले राजकीय प्रश्न आणि 2019 ची निवडणूक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढवण्यावर शिक्कामोर्तब झालं

देशभरातले राजकीय प्रश्न आणि 2019 ची निवडणूक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढवण्यावर शिक्कामोर्तब झालं

    10 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच 2019 च्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा फैसला एनडीएच्या बैठकीत घेण्यात आलाय.

    2014 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएवर जमलेला बर्फ वितळवण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहांनी मित्रपक्षासाठी दिल्लीत जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. शिवसेनेसह भाजपाचे 33 मित्रपक्षाचे सर्वोच्च नेते उपस्थित होते. देशभरातले राजकीय प्रश्न आणि 2019 ची निवडणूक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढवण्यावर शिक्कामोर्तब झालं.

    शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी अमित शहांशी 20 मिनिट बैठकीआधी चर्चा केली. या माध्यमातून भाजप आणि शिवसेना यांच्यातले संबंध सुरळित होतील याची प्रकिया सुरू झालीय. या बैठकीत राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची चर्चा झाली नाही असा दावा चंद्राबाबू नायडू करत असले तरी निवडणुकीच्या काळात कोणीही नाराज होऊ नये याची काळजी भाजप घेताना दिसतंय.

    First published:

    Tags: NDA, Pm modi, एनडीए, नरेंद्र मोदी