पंजाब, 18 सप्टेंबर : पंजाबचे मुख्यमंत्री (Punjab Next Chief Minister) अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे (Amrinder Singh resigns as Punjab CM post ) सोपवला आहे. त्यांच्या अचानक आलेल्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामागे नवज्योत सिंग सिद्धू यांचा हात असल्याची चर्चा आहे. दरम्यान राजीनाम्याच्या काही तासांनंतंर अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. एएनआयने यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यांनी केलेल्या ट्विटनुसार, नवज्योत सिंग सिद्धू यांची पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावर निवड करण्यास अमरिंदर सिंग यांनी विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले, नवज्योत सिंग सिद्धू मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम नाही. ते देशासाठी आपत्ती ठरतील. त्याचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावर घेण्यास माझा नकार आहे. त्यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. त्यामुळे देशाचा सुरक्षेसाठी हे धोकादायक आहे, अशा शब्दात अमरिंदर सिंग यांनी आपला राग व्यक्त केला. (Navjot Singh Sidhus connection with Pakistan Amarinder Singhs shocking allegation after punjab CMs resignation)
Navjot Sidhu is 'incompetent', has connections with Pakistan, will oppose any move to make him Punjab CM: Amarinder Singh
— ANI Digital (@ani_digital) September 18, 2021
Read @ANI Story | https://t.co/qL0Bi0u2kB#PunjabCongressCrisis #AmarinderSingh #NavjotSinghSidhu pic.twitter.com/EwhSAsAzOf
हे ही वाचा- सिद्धूंनी केला कॅप्टनचा पत्ता कट; अमरिंदर सिंह यांनी दिला CM पदाचा राजीनामा पंजाबच्या (Punjab Political News) राजकीय वर्तुळातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाब काँग्रेसमध्ये (Punjab Congress News) सुरू असलेल्या ओढाताणीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांनी राज्यपालांकडे (Punjab Governor) आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. (Amrinder Singh resigns as Punjab CM post) याबाबत त्यांचा मुलगा रनिंदर सिंह यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी अमरिंदर सिंह राजीनामा देत असल्याचं दिसत आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुनील जाखड, सुखजिंदर रंधवा आणि प्रताप सिंह बाजवा यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय नवज्योत सिंग सिद्धू यांचंही नाव नव्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत घेतलं जात आहे.

)







