चंडीगड, 18 सप्टेंबर : Captain Amrinder Singh Resignation: पंजाबच्या (Punjab Political News) राजकीय वर्तुळातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाब काँग्रेसमध्ये (Punjab Congress News) सुरू असलेल्या ओढाताणीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना राजीनामा द्यावा लागला आहे. .
त्यांनी राज्यपालांकडे (Punjab Governor) आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. (Amrinder Singh resigns as Punjab CM post)
याबाबत त्यांचा मुलगा रनिंदर सिंह यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी अमरिंदर सिंह राजीनाम देत असल्याचं दिसत आहे. राजीनामा दिल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी राजभवनच्या बाहेर पत्रकार परिषद घेतली. यासंदर्बात त्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी समर्थक मंत्री आणि आमदारांसह बैठक केली होती.
CM @capt_amarinder has met Punjab Governor and submitted his and his council of ministers’ resignation. He will address the media at the Raj Bhavan gate in a few minutes from now.
— Raveen Thukral (@RT_MediaAdvPBCM) September 18, 2021
पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत वादातून (Punjab Congress Crisis) हा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्यामुळे कॅप्टन यांना राजीनामा द्यावा लागल्याचं राजकीय वर्तुळात सांगितलं जात आहे.
सुनील जाखड होणार नवे मुख्यमंत्री?
हे ही वाचा-पंजाब काँग्रेसमध्ये भूकंप, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह राजीनामा देणार?
नवीन मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी काँग्रेस आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे. सुनील जाखड यांचं नाव नव्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रणी आहे. आज सुनील जाखड यांनी एक ट्विट केलं आहे, त्यात लिहिलं की, राहुल गांधी यांनी पंजाब काँग्रेसमधील वाद सोडविण्यासाठी जे पाऊल उचललं त्या धाडसी निर्णयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. याशिवाय अकाली दलालाही मोठा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुनील जाखड, सुखजिंदर रंधवा आणि प्रताप सिंह बाजवा यांची नावे आघाडीवर आहेत.
सोनिया गांधींकडे व्यक्त केली नाराजी
अमरिंदर सिंह यांनी सोनिया गांधींशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांच्या झालेल्या अपमानाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, आतापर्यंत अशा प्रकारचा अपमान खूप झाला. असा अपमान सहन करत मी पक्षात राहू शकत नाही. मात्र सध्या अमरिंदर यांची सोनिया गांधी यांच्याशी बोलत असल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chief minister, Punjab, Resignation, Sonia gandhi, काँग्रेस