मराठी बातम्या /बातम्या /देश /

योगा आणि डाएटच्या मदतीनं नवज्योतसिंग सिद्धूंनी तुरुंगात कमी केलं तब्बल 34 किलो वजन

योगा आणि डाएटच्या मदतीनं नवज्योतसिंग सिद्धूंनी तुरुंगात कमी केलं तब्बल 34 किलो वजन

नवज्योत सिद्धू

नवज्योत सिद्धू

6 फूट 2 इंच उंच सिद्धू यांचं वजन आता 99 किलो झालं आहे. योगा आणि डाएटनं जेलमध्ये केली कमाल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 नोव्हेंबर :   पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रमुख आणि माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू 1988 च्या रोड रेजप्रकरणी एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. ते सध्या पटियाला सेंट्रल जेलमध्ये आहेत. तुरुगांतील मागच्या सहा महिन्याच्या काळात त्यांनी तब्बल 34 किलो वजन कमी केलं आहे, असा दावा त्यांच्या एका मित्राने केला आहे. डाएट, योग आणि व्यायाम याच्या मदतीने त्यांनी वजन कमी केल्याचं म्हटलं जातंय. 6 फूट 2 इंच उंच सिद्धू यांचं वजन आता 99 किलो झालं आहे.

सिद्धू यांचे सहकारी आणि माजी आमदार नवतेजसिंग चीमा यांच्या मते, सिद्धू किमान चार तास ध्यान, दोन तास योगा आणि व्यायाम, दोन ते चार तास वाचन आणि फक्त चार तास झोपतात. “जेव्हा सिद्धूसाहेब त्यांची शिक्षा पूर्ण करून बाहेर येतील, तेव्हा त्यांना पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. क्रिकेट खेळताना ते जसे दिसायचे, तसेच आता दिसत आहेत. त्यांनी 34 किलो वजन कमी केलंय आणि ते आणखी कमी करणार आहेत. त्यांचं वजन आता 99 किलो आहे. पण त्यांची उंची 6 फूट 2 इंच असल्याने सध्याच्या वजनात ते देखणे दिसतात. ध्यानात बराच वेळ घालवल्यामुळे ते शांत दिसत आहेत. त्यांना खूप चांगलं वाटतंय, आधी ते लिव्हरच्या समस्येमुळे थोडे त्रस्त होते, पण आता त्या समस्येतही सुधारणा झाली आहे," असं चीमा म्हणाले. त्यांनी शुक्रवारी पटियाला तुरुंगात सिद्धूंची 45 मिनिटं भेट घेतली.

हेही वाचा - भूक लागत नाही, भूक मंदावलीय? नक्की करून पहा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

सिद्धू यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि एम्बॉलिझमचा त्रास आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नारळ पाणी, कॅमोमाइल चहा, बदामाचं दूध आणि रोझमेरी चहा यासह विशेष आहाराचा सल्ला दिला होता. त्यांनी साखर आणि गव्हाचं सेवन पूर्णपणे बंद केलंय. ते दिवसातून फक्त दोन वेळा जेवतात. संध्याकाळी सहानंतर ते काहीही खात नाहीत. तुरुंगातील कारकुनी काम करण्यासाठी त्यांची ‘मुन्शी’ (क्लार्क) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते क्लार्क म्हणून आपली कामं पूर्ण करण्यासाठी दिवसभरात काही तास घालवतात. तुरुंग अधिकारी त्यांना काही कागदपत्रं पाठवतात, त्या संबंधी कामं ते त्यांच्या बॅरेकमधूनच करतात,” असं चीमा यांनी सांगितलं.

“सिद्धू तुरुंगात इतर कैद्यांशीही संवाद साधतात, ते सेलिब्रिटी असल्याने काही जण त्यांना भेटायला येतात,” असंही चीमा म्हणाले.

जेल मॅन्युअलनुसार कैद्यांची अनस्कील्ड, सेमी-स्कील्ड आणि स्कील्ड अशी विभागणी करण्यात आली आहे. अनस्कील्ड, सेमी-स्कील्ड कैद्यांना अनुक्रमे 40 आणि 50 रुपये प्रतिदिन मजुरी मिळते. तर स्कील्ड कैद्यांना दिवसाला 60 रुपये मिळतात. सप्टेंबरपर्यंत सिद्धूंसोबत पंजाबी गायक दलेर मेहंदी यांना बॅरेक क्रमांक 10 मध्ये ठेवण्यात आलं होतं, नंतर त्यांची सुटका झाली होती.

First published:

Tags: Punjab, Weight, Weight loss