मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अक्षयच्या 'सूर्यवंशी'ला घाबरला पाकिस्तान? पाक राष्ट्रपतींच्या आक्षेपांमागे काय आहे कारण?

अक्षयच्या 'सूर्यवंशी'ला घाबरला पाकिस्तान? पाक राष्ट्रपतींच्या आक्षेपांमागे काय आहे कारण?

ब्रिटिश अभिनेता रिज अहमद आणि पाकिस्तानी माध्यमांनी सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाविषयी नवा वाद सुरू झाला आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी त्यात उडी घेतली आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीनं (Rohit Shetty) स्पष्टीकरण दिलं आहे.

ब्रिटिश अभिनेता रिज अहमद आणि पाकिस्तानी माध्यमांनी सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाविषयी नवा वाद सुरू झाला आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी त्यात उडी घेतली आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीनं (Rohit Shetty) स्पष्टीकरण दिलं आहे.

ब्रिटिश अभिनेता रिज अहमद आणि पाकिस्तानी माध्यमांनी सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाविषयी नवा वाद सुरू झाला आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी त्यात उडी घेतली आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीनं (Rohit Shetty) स्पष्टीकरण दिलं आहे.

दिल्ली, 20 नोव्हेंबर: कोरोनाच्या (Coronavirus lock-down theater release) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे प्रदीर्घ काळ बंद असलेली चित्रपटगृहं (Cinema Hall) पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृह सुरू झाल्यानं निर्मात्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. चित्रपटगृहं सुरू होताच अभिनेता अक्षय कुमारचा सूर्यवंशी (Sooryavanshi) हा ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office Suryavanshi) जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. बऱ्याच काळानंतर चित्रपटगृहात चित्रपटाचा आनंद घेता येत असल्यानं या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

कमाईचा विचार केला तर या चित्रपटानं 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. परंतु, आता या चित्रपटाची वेगळ्याच कारणानं चर्चा होत आहे. या चित्रपटावर पाकिस्ताननं (Pakistan) आक्षेप घेतला असून, या चित्रपटामुळे इस्लामोफोबिया (Islamophobia) वाढत असल्याचं पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी  (Pakistani President arif alvi) आणि अभिनेत्री मेहविश यांनी म्हटलं आहे. तसंच या वादात ब्रिटिश अभिनेता रिज अहमद आणि पाकिस्तानी माध्यमांनीही उडी घेतली आहे. यावर दिग्दर्शक रोहित शेट्टीनं (Rohit Shetty) स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबचं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने दिलं आहे.

सूर्यवंशी हा बॉलिवूडपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे; मात्र या चित्रपटात एक मुस्लिम (Muslim) व्यक्ती खलनायक असून, पाकिस्ताननं यावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटातला खलनायक मुस्लिमच का असा सवाल पाकिस्तानी नागरिकांनी विचारला आहे. याबाबत दिग्दर्शक रोहित शेट्टीला प्रश्न विचारला असता त्यानं स्पष्टीकरण दिलं आहे, की `या चित्रपटातला खलनायक हिंदू असता तर त्याबाबतही असेच प्रश्न उपस्थित झाले असते. पाकिस्तानातून एखादा दहशवादी भारतात आला तर त्याचं नाव काय ठेवलं जातं? त्याचा धर्म कोणता असतो? चित्रपटाच्या कथेचा हा एक भाग आहे आणि ती कथेची गरजदेखील. पाकिस्तानातून एक दहशतवादी येतो आणि आमचे पोलिस त्याला पकडतात इतकंच.`

अंकिता लोखंडेच्या केळवणासाठी 'या' दोन मराठी अभिनेत्रींची स्पेशल तयारी

दरम्यान, याबाबत पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे, की `असा कंटेट हा इस्लामोफोबिक असून, तो भारताचा नाश करील. भारतातील नागरिक सुजाण आहेत आणि ते असे प्रकार रोखतील अशी मला आशा आहे.`

कायम वादग्रस्त असलेली पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातनं सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट लिहिली असून, त्यात ती म्हणते, की `मला सूर्यवंशी या चित्रपटाचा कंटेंट (Content) आणि त्यातल्या मुस्लिम पात्राविषयी आक्षेप आहे. हा चित्रपट इस्लामोफोबियाला खतपाणी घालणारा आहे. चित्रपटात मुस्लिम पात्रांना सकारात्मक दाखवता येत नसेल, तर किमान त्यांना योग्य न्याय देण्याची गरज आहे.`

आर्मीत भरती होण्याचं स्वप्न राहिलं अधुरचं, बाईक घसरली; मागून येऊन ट्रकनं चिरडलं

या वादात पाकिस्तानी माध्यमांनीदेखील (Pakistani Media) उडी घेतली आहे. पाकिस्तानमधल्या समा टीव्हीच्या एका वृत्तात सांगितलं गेलं, की `भारतात मुस्लिमांना खलनायक म्हणून दाखवण्याचा ट्रेंड 'उरी-द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटापासून सुरू झाला. त्यानंतर असे प्रकार सातत्यानं वाढत आहेत.`

ऑस्करसाठी नामांकन मिळालेला मूळचा पाकिस्तानी ब्रिटिश अभिनेता रिज अहमद यानंदेखील या प्रकारावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट करताना इमोजीचा (Emoji) वापर करून प्रतिक्रिया दिली आहे.

यावर स्पष्टीकरण देताना चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीनं हा चित्रपटाच्या कथेचा एक भाग असल्याचं सांगितलं आहे.

First published:

Tags: Akshay Kumar, Film, Muslim, Pakistan