मराठी बातम्या /बातम्या /देश /रामदेव बाबांनी ठोठावले सुप्रीम कोर्टाचे दरवाजे, अ‍ॅलोपथीबाबत वक्तव्यानंतर देशभरातून दाखल FIR रोखण्यासंदर्भात याचिका

रामदेव बाबांनी ठोठावले सुप्रीम कोर्टाचे दरवाजे, अ‍ॅलोपथीबाबत वक्तव्यानंतर देशभरातून दाखल FIR रोखण्यासंदर्भात याचिका

अ‍ॅलोपथीबाबत वक्तव्यानंतर रामदेव बाबांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांनी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर रोखण्याची मागणी केली आहे

अ‍ॅलोपथीबाबत वक्तव्यानंतर रामदेव बाबांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांनी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर रोखण्याची मागणी केली आहे

अ‍ॅलोपथीबाबत वक्तव्यानंतर रामदेव बाबांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांनी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर रोखण्याची मागणी केली आहे

नवी दिल्ली, 23 जून: अ‍ॅलोपथीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर बाबा रामदेव यांच्या (Yoga guru Ramdev) अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत. देशभरातील विविध ठिकाणी त्यांच्या विरोधात एफआयआर (FIR Against Ramdev baba) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हे एफआयआर रोखण्यात यावे याकरता बाबा रामदेव सुप्रीम कोर्टात (Supreme Court of India) पोहोचले आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यात नोंदवलेल्या एफआयआर एकत्र करून त्यांना दिल्लीत हस्तांतरित करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. देशातील विविध भागात दाखल करण्यात आलेल्या FIR लक्षात घेता त्यांनी कोर्टासमोर असं म्हटलं आहे की त्यांच्या विरोधात होणारी कोणतीही दंडात्मक कारवाई रोखली जावी.

स्वामी रामदेव यांनी त्यांच्या याचिकेमध्ये अशी मागणी केली आहे की, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) पाटणा आणि रायपूरमधील संस्थेद्वारे दाखल करण्यात आलेल्या FIR वर त्यांच्याविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाऊ नये. दरम्यान असं घडलं होतं की गेल्याच महिन्यात रामदेव बाबा यांनी कोरोना व्हायरसवरील उपचारांबाबत अ‍ॅलोपथीच्या क्षमतेबाबत काही सवाल उपस्थित केले होते.

हे वाचा-'फक्त 2 औषधं घेतली आणि कोरोना बरा झाला', मुख्यमंत्र्यांचा दावा

अ‍ॅलोपॅथीच्या औषधांमुळे लाखो लोक मरत आहेत, असे स्वामी रामदेव म्हणाले होते. ऑक्सिजन आणि उपचाराअभावी मरण पावलेल्यांच्या संख्येपेक्षा अशाप्रकारे मृत्यूची संख्या जास्त आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्वामी रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीला 'स्टुपिड' असं म्हटलं होतं.

स्वामी रामदेव यांच्या वक्तव्यानंतर देशभरातून असंतोषाची लाट पसरली होती. संतापलेल्या डॉक्टरांनी त्यांच्याविरोधात प्रदर्शन देखील केलं होतं, तसंच IMA च्या विविध युनिट्सनी देशभरात याचिका दाखल केली होती. रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देखील आक्षेप घेत रामदेव बाबांना पत्र लिहत माफी मागण्याचे सांगितले होते.

First published:
top videos

    Tags: Baba ramdev, Supreme Court of India