जाहिरात
मराठी बातम्या / देश / Naseeruddin Shah म्हणतात 'मुघलांचे देशासाठी योगदान', अभिनेत्यावर भडकले नेटकरी

Naseeruddin Shah म्हणतात 'मुघलांचे देशासाठी योगदान', अभिनेत्यावर भडकले नेटकरी

राजकीय वादांवर का बोलत नाहीत बॉलिवूडमधले तीनही खान्स? नसिरुद्दीन शाहांचा सवाल

राजकीय वादांवर का बोलत नाहीत बॉलिवूडमधले तीनही खान्स? नसिरुद्दीन शाहांचा सवाल

मुघलांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे (Nasiruddin Shah comment on Mughal) ते पुन्हा एकदा हेडलाईन्समध्ये दिसत आहेत. तर सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याचे पडसाद दिसून येत आहेत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 30 डिसेंबर: ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Nasiruddin Shah latest News) हे सध्या चित्रपटांमध्ये कमी दिसत असले, तरी आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहतात. नुकतंच मुघलांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे (Nasiruddin Shah comment on Mughal) ते पुन्हा एकदा हेडलाईन्समध्ये दिसत आहेत. तर सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याचे पडसाद दिसून येत आहेत. एका टीव्ही शोला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी मुघलांना ‘राष्ट्र निर्माते’ म्हटलं आहे. मुलाखतीची ही क्लिप (Nasiruddin Shah interview) सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. याचा आधार घेत सोशल मीडिया यूझर्स नसीरुद्दीन शाह यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. ‘द वायर’ या न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन (Nasiruddin on Muslim in India) म्हणतात, ‘मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र, मुस्लिम याचा सामना करतील. कारण आम्हाला आमचं घर वाचवायचं आहे, आम्हाला आमची मातृभूमी वाचवायची आहे, आपलं कुटुंब वाचवायचं आहे आणि आपल्या मुलांना वाचवायचं आहे.’ हे वाचा- महात्मा गांधींबद्दल केलेलं ‘ते’ वक्तव्य भोवलं, कालिचरण महाराजला मध्यप्रदेशात अटक “मुघलांनी देशासाठी दिलं योगदान” नसीरुद्दीन पुढे म्हणतात, ‘मुघलांनी केलेल्या अत्याचारांबाबत वारंवार बोलले जाते. मात्र, आपण हे का विसरतो, की या मुघलांनीच देशासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आहे. याच लोकांनी देशामध्ये कित्येक स्मारकं उभारली आहेत. यांच्या संस्कृतीमध्ये नाच, गाणी, चित्रकारी, साहित्य अशा गोष्टींचा समावेश आहे. मुघल इथे या देशाला आपला देश बनवण्यासाठी आले होते. त्यांना खरं तर आपण शरणार्थी (Mughals are Refugee) म्हणू शकतो.’ सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस नसीरुद्दीन शाह यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया (Nasiruddin Shah statement reaction) दिसून येत आहेत. एका ट्विटर युजरने फोटोच्या माध्यमातून ‘शरणार्थी’ आणि ‘शरण देणारा’ यामधील फरक दाखवला आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले, ‘आधी शरणार्थी बनून या, आणि मग मूळ निवासी आहेत त्यांनाच शरणार्थी बनवा; असंच सुरू आहे.’

    News18

    आणखी एका युजरने एक व्हिडीओ शेअर करत ‘भारतातील संगीतात योगदान देणारे मुघल आता अफगाणिस्तानातील संगीतात योगदान देत आहेत,’ असे म्हटलं आहे. ‘स्मारके, संस्कृती, नाच, गाणी आणि साहित्य हे मुघलांनी आणलं नाही. हे भारतात आधीपासूनच अस्तित्वात होतं. जर हे सगळं मुघलांचं असेल तर अफगाणिस्तानमध्ये हे का दिसत नाही?’, असा प्रश्नही आणखी एका ट्विटर यूझरने उपस्थित केला.

    जाहिरात

    काही महिन्यांपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नसीरुद्दीन शाह ट्रोल (Nasiruddin Shah on Taliban) झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुघलांबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात