Home /News /national /

Asteroid Attack: 11 फेब्रुवारीला पृथ्वीवर होणार मोठा विध्वंस? नासानंही केलं Alert

Asteroid Attack: 11 फेब्रुवारीला पृथ्वीवर होणार मोठा विध्वंस? नासानंही केलं Alert

Asteroid Attack

Asteroid Attack

'नासा'ने (Nasa) दिलेल्या माहितीनुसार 11 फेब्रुवारीला एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल. जर कदाचित तो पृथ्वीवर आदळला तर होणारा विनाश अतिशय भयंकर असेल, असे सांगण्यात आले आहे.

    नवी दिल्ली, 29 जानेवारी:  अॅस्टरॉइडमुळे (Asteroid Attack) पृथ्वीला (earth) धोका निर्माण होऊ शकतो, असं गेल्या अनेक वर्षांपासून म्हटलं जात आहे. अॅस्टरॉइड म्हणजे लघुग्रह. हे लघुग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात. अवकाशातून अनेक लघुग्रह (Asteroid Attack) हे पृथ्वीच्या दिशेने येत राहतात. यापैकी काही अगदी लहान आहेत. तर काही थेट समुद्रात (sea) पडतात. पण कधीकधी काही मोठे लघुग्रहही पृथ्वीवर पडण्याची शक्यता असते. त्यांच्यामुळे होणारा विध्वंस विचारांच्या पलीकडचा आहे असं म्हटलं जात की एक लघुग्रह एकदा पृथ्वीला धडकला होता. त्यामुळे पृथ्वीवरील डायनॉसॉर ( dinosaurs) हे नष्ट झाले होते. त्यातच आता नासाने (Nasa) सांगितले आहे की, '11 फेब्रुवारी 2022 रोजी एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल. तो पृथ्वीवर आदळला तर मोठा विध्वंस होऊ शकतो. पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या लघुग्रहाचा आकार एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा खूप मोठा आहे. हा ग्रह अवघ्या काही आठवड्यांत पृथ्वीच्या जवळ येईल. त्याला 138971 (2001 CB21) असं नाव देण्यात आले आहे. यासोबतच नासाने या ग्रहाची गणना संभाव्य धोक्यांमध्ये केली आहे. त्याची रुंदी 4 हजार 265 फूट आहे. नासाने या ग्रहाला पृथ्वीजवळून जाणाऱ्या लघुग्रहांच्या यादीत स्थान दिले आहे. तो पृथ्वीपासून 3 मिलियन मैल अंतरावरून जाणार असला तरी तो पृथ्वीच्या सर्वांत जवळून जाणारा लघुग्रह ठरणार आहे. हा लघुग्रह 21 फेब्रुवारी 1900 रोजी पहिल्यांदा दिसला होता. तेव्हापासून, तो जवळजवळ दरवर्षी सौर यंत्रणेच्या जवळून जातो. यापूर्वी हा लघुग्रह 18 फेब्रुवारी 2021 रोजी शेवटचा दिसला होता. त्याआधी 2011 मध्ये आणि पुन्हा 2019 मध्ये तो दिसला होता. तो नेमका कोठून जाईल, हे सध्या नासाने सांगितलेले नाही. पण 11 फेब्रुवारीला आणि त्यानंतर 24 एप्रिलला पृथ्वीजवळून तो जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर, हा लघुग्रह 2024 या वर्षात जानेवारी, जून आणि पुन्हा डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष दिसेल. नासाच्या गणनेनुसार, हा लघुग्रह 11 ऑक्टोबर 2194 पर्यंत पृथ्वीजवळून जाईल. अर्थात असे अनेक लघुग्रह आहेत, जे पृथ्वीच्या जवळून जातात. परंतु त्यांची माहिती उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत नासाने एक प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या ग्रहाची माहिती मिळू शकेल. खरे तर असे लघुग्रह ज्यांची माहिती उपलब्ध नाही, त्यांची चुकून पृथ्वीशी टक्कर झाली तर विनाश निश्चित आहे. अशा परिस्थितीत या ग्रहांवर विशेष लक्ष ठेवणं गरजेचे असते. आता 11 फेब्रुवारीला सुद्धा एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. त्यामुळे यादिवशी काय होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
    First published:

    Tags: Asteroid, Nasa

    पुढील बातम्या