मराठी बातम्या /बातम्या /देश /

माझ्या मृतदेहाचं दफन नको दहन करा, वक्फ बोर्डाच्या सदस्याची इच्छा; मृत्यूपत्रावरून जोरदार चर्चा

माझ्या मृतदेहाचं दफन नको दहन करा, वक्फ बोर्डाच्या सदस्याची इच्छा; मृत्यूपत्रावरून जोरदार चर्चा

माझा मृत्यू झाल्यावर (my body should be cremated as per hindu rituals says Wasim Rizvi) दफनविधी करण्याऐवजी चितेवर ठेऊन दहन करा, अशी इच्छा वसीन रिझवी यांनी व्यक्त केली आहे.

  • Published by:  desk news
लखनऊ, 15 नोव्हेंबर: माझा मृत्यू झाल्यावर (my body should be cremated as per hindu rituals says Wasim Rizvi) दफनविधी करण्याऐवजी चितेवर ठेऊन दहन करा, अशी इच्छा वसीन रिझवी यांनी व्यक्त केली आहे. रिझवी हे उत्तर प्रदेशच्या शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य आणि माजी अध्यक्ष आहेत. आपल्या वादग्रस्त (Known for his controversial statements) विधानांसाठी ते ओळखले जातात. मुस्लीम धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण अखेरच्या श्वासापर्यंत काम करत राहू आणि हे काम करताना (Won't fear to death) आपल्याला मृत्यू ओढवला तरी बेहत्तर, असं त्यांनी म्हटलं आहे. काय म्हणाले रिझवी? आपल्या मृत्यूनंतर आपले अंत्यसंस्कार कसे व्हावेत, याबाबत सविस्तर माहिती त्यांनी जाहीर केली आहे. चिता रचून हिंदू पद्धतीनं आपले अंत्यसंस्कार केले जावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. रविवारी जारी केलेल्या एका व्हिडिओत त्यांनी आपली अंतिम इच्छा व्यक्त केली आहे. आपल्याला ठार मारण्याचा कट रचला जात असून त्यासाठी इनामही जाहीर केलं जात आहे. कुराणातून 26 आयते काढून टाकावीत, अशी मागणी आपण सर्वोच्च न्यायालयात केली असून त्यामुळे अनेक कट्टरतावादी लोक आपल्या जीवावर उठले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्याला मृत्यूनंतर कब्रस्तानात जागाही न देण्याची घोषणा काही कट्टरपंथियांनी केली आहे. त्यामुळे आपल्या मृत्यूनंतर आपल्याला हिंदू पद्धतीनं दहन करण्यात यावं, असं त्यांनी म्हटलं आहे. हे वाचा -चोरी करण्यासाठी घरात शिरला पण सुंदर महिला दिसतात बदललं चोराचं मन आणि मग... असा व्हावा अंत्यसंस्कार आपल्या मृत्यूनंतर मृतदेह हा लखनऊमधील हिंदू मित्रांकडे सोपवण्यात यावा. आपल्यासाठी स्वतंत्र चिता रचली जावी. नरसिंहा नंद सरस्वती यांनीच आपल्या मृतदेहाला अग्नी द्यावा, अशी आपली इच्छा असल्याचं मृत्यूपत्र रिझवी यांनी तयार केलं आहे. मुस्लीम धर्मात सुधारणा सुचवणारं पुस्तक रिझवी  लिहिलं होतं. त्यानंतर मुस्लीम कट्टरपंथियांकडून त्यांच्या धमक्या येत असून आपण काम सुरुच ठेवणार असल्याचं रिझवी यांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Hindu, Muslim, Uttar pradesh

पुढील बातम्या