नवी दिल्ली 7 फेब्रुवारी : हिंदू देवी- देवतांबद्दल चुकीचं वक्तव्य करून कथितरित्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुजरातचा कॉमेडियन मुनव्वर फारुकीला (Munawar Faruqui) अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर शनिवारी रात्री उशीरा त्याला तुरूंगातून सोडण्यात आलं. गेल्या 35 दिवसांपासून फारुकी न्यायालयीन कोठडीत या तुरूंगात होता. केंद्रीय जेल प्रशासनानं प्रयागराज कोर्टानं जारी केलेल्या वॉरंटचा हवाला देत फारूकीला सोडण्यात शनिवारी संध्याकाळी असमर्थता दर्शवली होती. मात्र, नंतर तुरूंगाच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं, की याप्रकरणी न्यायलयानं शुक्रवारी दिलेल्या आदेशाला जवळपास 30 तास झाले आहेत. याच आधारावर फारुकीला रात्री उशीरा तुरूंगातून सोडण्यात आलं.
इंडियन एक्सप्रेससनं दिलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी इंदौरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांना फोन करून सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर हा आदेश तपासण्याचं आवाहन केलं. ज्यामध्ये त्यांनी मुनव्वर फारुकीला जामीन मंजूर केला होता. तसंच वॉरंटलाही स्थगिती दिली.
या आदेशानुसार, न्यायालयनं फारुकीला अंतरिम जामीन दिला होता. यासोबतच धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपात प्रयागराजमध्ये दाखल वॉरंटलाही स्थगिती दिली गेली होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, फारुकीच्या सुटकेची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा माध्यमांचे प्रतिनिधी तुरूंगच्या आवारात जमा झाले होते. परंतु धार्मिक दृष्ट्या संवेदनशील प्रकरणात अटक करण्यात आलेल्या फारुकीला गुप्तपणे याठिकाणाहून बाहेर पाठवण्यात आलं.
इंदौरमध्ये 1 जानेवारीला दाखल करण्यात आलेल्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या फारुकीला न्यायालयानं शुक्रवारीचं अंतरिम जामीन दिला होता. मुन्नवरच्या वकिलांनी इंदौरच्या जिल्हा न्यायालयात शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सादर करत सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्या. मात्र, स्थानिक न्यायालयानं फारुकीला 50 हजार रुपयांच्या जामिनावर आणि त्याच रकमेच्या हमीवर तुरूंगातून सोडण्याचे आदेश दिले.
फारुकीची सुटका होण्यापूर्वी केंद्रीय कारागृह अधिकाऱ्याने शनिवारी रात्री उशिरा सांगितलं, की प्रयागराज येथील न्यायालयानं फारुकीला तिथे दाखल असलेल्या खटल्यासाठी 18 फेब्रुवारीला हजर करण्याचे आदेश दिले आहेत.तुरूंगातील नियमावलीचा हवाला देऊन त्यांनी दावा केला होता की, फारुकीला तुरुंगातून सोडण्यासाठी आपल्याला प्रयागराजच्या न्यायलयाच्या किंवा सरकारच्या सक्षम अधिकार्याच्या आदेशाची आवश्यकता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.