मराठी बातम्या /बातम्या /देश /Selfie बेतली जीवावर; नदी किनारी सेल्फी घेणाऱ्या मुंबईकर महिला नदीत पडल्या, सासूचा मृत्यू तर होणारी सुन बेपत्ता

Selfie बेतली जीवावर; नदी किनारी सेल्फी घेणाऱ्या मुंबईकर महिला नदीत पडल्या, सासूचा मृत्यू तर होणारी सुन बेपत्ता

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

नदीच्या किनारी सेल्फी घेणं जीवावर बेतलं आहे. सेल्फी घेताना दोन महिला नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत मुंबईतील महिलेचा मृत्यू झाला आहे.

जबलपूर, 8 जानेवारी : सेल्फी (Selfie) घेत असताना दुर्घटना घडल्याच्या आतापर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, असे असतानाही अनेकजण आपल्या जीवाची पर्वा न करता सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. सेल्फी घेताना दोन मुंबईकर महिला (Mumbaikar women) नदीत कोसळल्या आहेत. या दुर्घटनेत सासूचा मृत्यू झाला आहे तर सुन अद्यापही बेपत्ता आहे. मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील भेडाघाट (Bhedaghat Jabalpur) येथे ही घटना घडली आहे.

पिकनिक स्पॉटवर सेल्फी घेताना होणाऱ्या दुर्घटना काही कमी होताना दिसत नाहीयेतय मध्यप्रदेशातील भेडाघाट येथे मुंबईतील सोनी दाम्पत्य आणि त्यांची होणारी सून हे पर्यटनासाठी गेले होते. भेडाघाट येथे नदीकिनारी सेल्फी घेण्याचा त्यांना मोह आवरला नाही. त्यावेळी सासू हंसा सोनी आणि होणारी सून रिद्धी या सेल्फी काढण्यासाठी नदी किनारी उभ्या राहिल्या. सेल्फी घेत असताना पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यांचा तोल गेला.

सेल्फी घेताना तोल गेल्याने हंसा सोनी आणि होणारी सून रिद्धी या नदीत कोसळल्या. नदीच्या प्रवाहात दोघीही वाहून गेल्या. या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी आरडाओरड करताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

स्थानिकांनी मदतीसाठी नदीत उडी घेतली आणि हंसा सोनी यांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. तर सून रिद्धी ही अद्यापही बेपत्ता आहे. रिद्धी हिचा अद्यापही शोध सुरू आहे.

वाचा : हात जोडून विनवणी करूनही चाटायला लावली थुंकी; BJP कार्यकर्त्यांकडून युवकाला अमानुष मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील निवासी अरविंद सोनी (53 वर्षे) यांनी सांगितली की पत्नी हंसा सोनी (वय 50 वर्षे) मुलगा राज सोनी (वय 23 वर्षे) आणि होणारी सून (रिद्धी (वय 22 वर्षे) हे सर्वजण भेडाघाट येथे पर्यटनासाठी पोहोचले होते. दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास हंसा आणि रिद्धी यांनी मोबाइलवर टाईम सेट करुन फोटो काण्यासाठी दगडावर उभ्या राहिल्याय त्यावेळी त्यांचा तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या.

रोपवे ने भेडाघाट गाठलं

तिलवारा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईतील अरविंद सोनी, त्यांची पत्नी हंसा सोनी, मुलगा राज सोनी आणि होणारी सून रिद्धी हे सर्वजण न्यू भेडाघाट येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारच्या सुमारास चौघेही रोप वे च्या माध्यमातून न्यू बेडाघाट येथे पोहोचले. त्यानंतर सेल्फी घेण्याचा त्यांना मोह आवरला नाही आणि हिच सेल्फी जीवावर बेतली.

First published:

Tags: Madhya pradesh, Selfie