Home /News /national /

Punjab Election 2022:  प्रथमच बहुरंगी लढत, शिअद आणि काँग्रेसची मते अनेक पक्षांमध्ये विभागली जाणार

Punjab Election 2022:  प्रथमच बहुरंगी लढत, शिअद आणि काँग्रेसची मते अनेक पक्षांमध्ये विभागली जाणार

Punjab Elections 2022, Assembly Elections 2022: माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस (पीएलसी) आणि सुखदेव सिंग धिंडसा यांच्या एसएडी (युनायटेड) यांनी भाजपसोबत युती केली आहे. याशिवाय राज्यातील विधानसभेच्या एकूण 117 जागांवर लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवार विजयी होण्याचीही अपेक्षा आहे.

पुढे वाचा ...
    चंदीगड, 09 जानेवारी : पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly elections) प्रथमच बहुरंगी लढत होणार असून, त्यामुळे काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) या दोन पारंपारिक पक्षांच्या मतांची टक्केवारी अनेक राजकीय पक्षांमध्ये विभागली जाण्याची शक्यता आहे. 2017 च्या निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये काँग्रेस (Congress) आणि एसएडी-भाजप युतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुरंगी लढत होत होती. परंतु, 2017 च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (आप) प्रवेशानंतर ही परंपरा खंडित झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर शिरोमणी अकाली दल भाजपसोबतची युती तोडून बसपसोबत एकत्र निवडणूक लढवत आहे. कोणत्या पक्षांमध्ये रंगणार लढत यावेळी काँग्रेस, एसएडी-बहुजन समाज पक्ष युती, आम आदमी पार्टी (आप), संयुक्त समाज मोर्चा (एसएसएम) आणि भाजपनं शिरोमणी अकाली दलापासून विभक्त झाल्यानंतर अलीकडेच पंजाब लोक काँग्रेस (पीएलसी) आणि शिरोमणी अकाली दल (संयुक्त) यांच्याशी युती केली आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस (पीएलसी) आणि सुखदेव सिंग धिंडसा यांच्या एसएडी (युनायटेड) यांनी भाजपसोबत युती केली आहे. याशिवाय अनेक जागांवर लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवार विजयी होण्याचीही अपेक्षा आहे. 2012 आणि 2017 च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? 2012 आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिरोमणी अकाली दलाच्या नेतृत्वाखाली भाजपसह झालेल्या युतीला काँग्रेसपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं. 2012 मध्ये, एसएडी-भाजप युतीनं एकूण मतांपैकी 41.91 टक्के मतं मिळविली. यापैकी एसएडीला 34.73 टक्के आणि भाजपला 18 टक्के मतं मिळाली. त्या वर्षी काँग्रेसला 40.09 टक्के मतं मिळाली होती. 2017 च्या निवडणुकीत, काँग्रेसची मतं 38.5 टक्क्यांपर्यंत घसरली. तरीही ती निवडणूक त्यांनी जिंकली. दुसरीकडे, एसएडी-भाजप युतीला 30.64 टक्के मते मिळाली, यामध्ये एसएडीला 25.24 टक्के आणि भाजपची मते 5.4 टक्के होती. आम आदमी पक्षाला 13.72 टक्के मतं मिळाल्यानं मतांच्या टक्केवारीत घट होऊनही काँग्रेसनं विजय मिळवला. 2017 मध्ये पंजाबमध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या 'आप'ला 20 जागा जिंकता आल्या. राजकीय विश्लेषक काय म्हणतात? राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, काँग्रेस आणि एसएडी या दोन्ही पक्षांच्या तुलनेत 'आप'ला सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या निवेदनात, पंजाब विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक आशुतोष कुमार यांनी म्हटलंय की, AAP नं पहिल्या विधानसभा निवडणुकीत एसएडीला मिळणाऱ्या मतांच्या संख्येला प्रभावित केलं होतं. येत्या निवडणुकीत दोन्ही पारंपारिक पक्षांची काही मतं काही प्रमाणात मिळाल्यानं 'आप'ला फायदा होऊ शकतो, असे ते म्हणाले. हे वाचा - Eknath Khadse : ‘गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल’, खडसे-महाजन यांंच्यात जुंपली प्रोफेसर कुमार म्हणाले की, 'आप'ला नक्कीच फायदा होईल. मात्र, मतसंख्या वाढल्यानं त्यांना अधिक जागा जिंकता येतील का, हे पाहणं गरजेचं आहे. शेतकरी आणि कृषी गटांचे प्रतिनिधीत्व करणारी एक राजकीय संघटना संयुक्त समाज मोर्चानंही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. कृषी चळवळीच्या यशाचा वापर करत या संघटनेनं एकट्यानं फायदा मिळवायचा प्रयत्न केला तर त्याचा सर्वाधिक परिणाम 'आप'वर होईल. मात्र, 'आप'शी हातमिळवणी केल्यास एसएडी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना ही जोडी मोठा धक्का देणारी असेल. हे वाचा - Corona in Parliament : संसदेत कोरोनाचा हाहा:कार, तब्बल 400 जणांना लागण, व्यंकय्या नायडूंकडून नवे निर्देश जारी भाजपला मतांची टक्केवारी वाढण्याची आशा भाजपनं अधिक जागांवर निवडणूक लढवल्यानं त्यांच्या मतांची टक्केवारीही वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्ष हिंदू मतांसाठी एकमेकांशी संघर्ष करत असल्यानं भाजपला झालेला कोणताही फायदा काँग्रेससाठी तोटा ठरेल. राज्याच्या लोकसंख्येपैकी 38.5% हिंदू आहेत. धर्म-आधारित लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार, राज्याच्या लोकसंख्येपैकी 57.69 टक्के शीख आहेत. त्यानंतर मुस्लिम 1.93 टक्के, ख्रिश्चन 1.3 टक्के, बौद्ध 1.2 टक्के, जैन 0.16 टक्के आणि इतर/गैर-धार्मिक 0.31 टक्के आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Election, Punjab

    पुढील बातम्या