कोरोना संकटात Relianceचा मदतीचा हात; राज्यांना दररोज 700 टनहून अधिक Oxygen चा मोफत पुरवठा

कोरोना संकटात Relianceचा मदतीचा हात; राज्यांना दररोज 700 टनहून अधिक Oxygen चा मोफत पुरवठा

Reliance Industries Ltd produce over 700 tones oxygen: उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी ऑक्सिजन पुरवठा करुन देशाला मोठी मदत करत आहे.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Ltd.) कोरोनाच्या संकटात (Corona Pandemic) देशाच्या मदतीला धावून आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या जामनगर ऑईल रिफायनरी (Jamnagar refineries)मध्ये दररोज 700 टनहून अधिक वैद्यकीय ऑक्सिजन तयार करत (produce over 700 tones medical oxygen per day) आहे. हे ऑक्सिजन कोविड-19 मुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा असलेल्या राज्यांना विनाशुल्क म्हणजेच मोफत देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी होत आहे. ऑक्सिजनचा वापर लक्षात घेता रिलायन्सने अधिक ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रिलायन्स कंपनीला आपल्या उत्पादन पद्धतीत बदल करावा लागला आहे. गुजरातमधील कंपनीच्या जामनगर रिफायनरीत सुरुवातीला 100 टन वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती केली जात होती. मात्र, आता ही निर्मिती वाढवून 700 टन करण्यात आली आहे.

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशात पुरवठा

कोरोना संक्रमणाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश यासारख्या राज्यांना पुरवल्या जाणाऱ्या या ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे दररोज 70,000 हून अधिक गंभीर रुग्णांना त्यामुळे दिलासा मिळेल. लवकरच कंपनीकडून मेडिकल ग्रेडच्या ऑक्सिजनचे उत्पादन वाढवून 1000 टन करण्याची योजना आखत आहे.

वाचा: कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार! Johnson & Johnson Corona vaccine चे दोन नाही तर फक्त एकच डोस घ्यावा लागणार

रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीत कच्च्या तेलापासून डिझेल, पेट्रोल आणि जेट इंधन यासारख्या वस्तू बनवल्या जातात, जेथे मेडिकल ग्रेड ऑक्सिजन तयार होत नाही. मात्र, कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ आणि ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता रिलायन्सने आपल्या प्लान्टमध्ये संबंधित यंत्रणा उभारली ज्यामुळे वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनची निर्मिती करणं शक्य झालं आहे. मेडिकल ग्रेड ऑक्सिजन तयार करण्यासाठी ओद्योगिक ऑक्सिजन तयार करण्याच्या सुविधांचा उपयोग केला जात आहे.

दररोज 70 हजार रुग्णांना दिलासा

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून करण्यात येत असलेल्या या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे दररोज जवळपास 70,000हून अधिक गंभीर रुग्णांना त्याचा फायदा होऊन दिलासा मिळणार आहे.

Published by: Sunil Desale
First published: April 20, 2021, 9:12 PM IST

ताज्या बातम्या