Home /News /money /

बँकिंग सेक्टरमध्ये मोठ्या बदलाची गरज; रघुराम राजन आणि विरल आचार्यांनी सुचवले पर्याय

बँकिंग सेक्टरमध्ये मोठ्या बदलाची गरज; रघुराम राजन आणि विरल आचार्यांनी सुचवले पर्याय

या दोन्ही अर्थतज्ज्ञांनी लिहिलेल्या या रिसर्च पेपरमध्ये देशातील बँकिंग सेक्टरमधील समस्या आणि त्यावरील उपायांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : भारतीय रिजर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी माजी आरबीआय डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य (Viral Acharya) यांच्यासोबत मिळून भारतीय बँकिंग सेक्टर (Banking Sector of India)च्या परिस्थितीवर एक रिसर्च पेपर लिहिला आहे. या दोन्ही अर्थतज्ज्ञांनी लिहिलेल्या या रिसर्च पेपरमध्ये देशातील बँकिंग सेक्टरमधील समस्या आणि त्यावरील उपायांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ज्यामुळे हे सेक्टर अधिक मजबूत करण्यात येईल. त्यंनी सरकारी बँकावर विशेष अर्थाने चर्चा केली आहे. रघुराम राजन सध्या शिकागो विद्यापीठात प्रोफेसर आहेत. विरल आचार्य गेल्या वर्षी जुलै महिन्यात आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिन्यांपूर्वी RBI डेप्युटी गर्व्हनर पदावरुन राजीनामा दिला.  राजन यांनी या रिसर्च पेपरबाबत लिंक्डन अकाऊंवर माहिती दिली आहे. सरकारी बँंकामध्ये अडकलेल्या कर्जाची समस्या या पेपरमध्ये दोन्ही अर्थतज्ज्ञांनी सर्वात आधी याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की गेल्या काही दशकादरम्यान भारतात बँकिंग सेक्टरमध्ये इतकी आव्हानं काय येत आहेत? यामध्ये विशेषत: सरकारी बँकिंग सेक्टर (Public Sector Banks) वर लक्ष देण्यात आलं. खासगी सेक्टर बँकांच्या तुलनेत सार्वजनिक सेक्टर बँंकामध्ये लोन (Bad Loan) ची समस्या सर्वात जास्त आहे. यामध्ये अधिकतर भाग रिकवर होऊ शकत नाही. त्यांनी या सेक्टरमध्ये संस्थांच्या नियमांबाबतच उल्लेख केला आहे. भारतात अडकलेल्या  कर्जाच्या रिजॉल्युशन (Loan Resolution) मध्येही एक समस्या आहेत. ते म्हणाले की अनेक दशकांपासून भारतात अडकलेल्या कर्जाची समस्या कशी सोडवता येईल. सरकारी बँंकाच्या प्रबंधनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यांनी काही असे मार्ग सुचविले आहे, ज्यामुळे बँक अत्यंत चांगल्या पद्धतीने लोन जारी केल्यानंतर त्याला मॉनिटर करू शकतो. यामुळे बँंका संकटात सापडण्याच प्रमाण कमी होईल. या बाबींचा उल्लेख यामध्ये त्यांनी खराब लोकचं डील करणे, सार्वजनिक सेक्टर बँकांना मजबूत करणं, सार्वजनिक सेक्टर बँकांच्या वैकल्पिक स्वामित्वबाबत, बँकांनी जोखीम प्रबंधन (आपात्कालिन परिस्थितीत) अधिक चांगले करण्यासाठी आणि बँकिंक स्ट्रक्चरमध्ये विविध पर्यायांबाबत लक्ष केंद्रिय केले आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Raghuram rajan

    पुढील बातम्या