मराठी बातम्या /बातम्या /देश /

धोनीच्या शेतात डौलाने मोहरलंय मोहरीचं पीक, माहीलाही आवरला नाही सेल्फी घेण्याचा मोह

धोनीच्या शेतात डौलाने मोहरलंय मोहरीचं पीक, माहीलाही आवरला नाही सेल्फी घेण्याचा मोह

माही अनेकदा त्याच्या फार्महाऊस (MS Dhoni Farmhouse in Ranchi) ला भेट देतो आणि शेतातील फळपिकांचा आस्वादही घेतो. चार दिवसांपूर्वी जेव्हा माही फार्म हाऊसवर पोहोचला, तेव्हा शेतातील बहरलेल्या मोहरीच्या पिकानं त्याचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी धोनीने काढलेला एक सेल्फीही समोर आला आहे

पुढे वाचा ...

रांची, 21 जानेवारी: क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीचं (Mahendra Singh Dhoni) शेतीविषयी प्रेम सर्वांना माहीत आहे. रांचीत गेल्यावर तो दीर्घकाळ शेतीत रमतो. सध्या काहीसं असंच चित्र पाहायला मिळत आहे. धोनीच्या शेतात मोहरीचं पीक (Mustard crop) सध्या ऐनभरात आलं आहे. धोनीनं शेतावर चक्कर टाकली तेव्हा, या पिकानं त्याचं लक्ष वेधून घेतलं. मोहरीचं पीक पाहून धोनीला मोह आवरता आला नाही, त्याने शेताच्या मध्यभागी उभं राहून पिकासोबत फोटोज काढले आहेत.

क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी शांबो येथील फार्म हाऊस परिसरात बऱ्याच काळापासून शेती करत आहे आणि आपण शेतीतही अव्वल आहोत हे त्याने सिद्ध केल्याचं सर्वांना माहिती आहे. सध्या धोनीच्या फार्म हाऊसमध्ये मोहरीचं पिवळं पीक बहरलं आहे. 43 एकरच्या फार्म हाऊसमधील हे मोहरीचं शेत लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. खुद्द महेद्रसिंग धोनीलाही हे मोहरीचं शेत आकर्षित करत आहे. नुकतंच धोनीनं त्याचा कृषी सल्लागार रोशनसह शेताच्या मध्यभागी उभं राहून काही फोटोज काढले. जवळपास एक आठवड्यापासून धोनी कुटुंबियांसमवेत रांचीमध्ये असून, सिमालिया येथील निवासस्थानी तो या मनमोकळ्या क्षणांचा आनंद घेत आहे. माही अनेकदा त्याच्या फार्महाऊस (MS Dhoni Farmhouse in Ranchi) ला भेट देतो आणि शेतातील फळपिकांचा आस्वादही घेतो. चार दिवसांपूर्वी जेव्हा माही फार्म हाऊसवर पोहोचला, तेव्हा शेतातील बहरलेल्या मोहरीच्या पिकानं त्याचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी तो बहरलेल्या मोहरीच्या पिकाचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. मोहरीच्या शेताच्या मध्यभागी उभं राहून त्याने फोटोज देखील घेतले.

हे वाचा-IND vs SA : पंतने 85 रन ठोकून घडवला इतिहास, धोनी-द्रविडचा रेकॉर्ड मोडला

धोनीचे कृषी सल्लागार रोशन यांनी सांगितलं की, 'या शेतात आंतरपीक पध्दतीचा (Intercropping system) अवलंब केला असून, मोहरीची लागवड करण्यात आली आहे. मोहरीत वाटाण्याचं (Green Peas) आंतरपीक घेतलं आहे. वास्तविक आंतरपीक पध्दतीत शेतात एका पेक्षा जास्त पिकांची लागवड केली जाते. त्यामुळे अधिक उत्पादन आणि उत्पन्न मिळते. या 43 एकर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी, कोबी, आलं (अद्रक), सिमला मिरची, फ्लॉवरसह अन्य भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे.'

हे वाचा-स्टीव्ह स्मिथला धक्का, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फेटाळली मोठी मागणी!

'धोनी हिरव्या पालेभाज्यांचा (Green Vegetables) फॅन आहे. तो जेव्हा रांचीत वास्तव्यास असतो, तेव्हा शेतातील ताज्या हिरव्या पालेभाज्या खाण्यास प्राधान्य देतो. मात्र, दरवर्षीप्रमाणे याही भाज्या रांचीच्या बाजारपेठेत पाठवल्या जात आहेत. बाजारपेठेतील माहीच्या दोन आऊटलेटसवर या भाज्यांची विक्री सुरू आहे,' असं रोशन यांनी सांगितलं. धोनीचं मोहरीचं शेत खरं तर आता सेल्फी पॉईंट बनत आहे. हे पीक इतकं सुंदर आहे की येथे काम करणारे कर्मचारीही या शेतात येऊन त्यांचे फोटो काढायला विसरत नसल्याचं चित्र आहे.

First published:

Tags: MS Dhoni