...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका! कंपनीने नागरिकांना केलं सूचित

...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका! कंपनीने नागरिकांना केलं सूचित

लस टोचणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते, मात्र...

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जानेवारी : देशात कोरोनाविरोधात लसीकरण (Corona Vaccination) सुरू झालं आहे. सरकारकडून कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या दोन्ही  लसीकरणाला मंजुरी दिली आहे. तिसऱ्या टप्प्यात जारी कोवॅक्सीनचं ट्रायल पाहता कंपनीने लस टोचून घेणाऱ्या नागरिकांसाठी आता फॅक्ट शीट जारी करीत सावधानतेचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. (if so dont get vaccinated against corona )

अशा लोकांनी लसीकरणापासून राहावे दूर

कोवॅक्सीन तयार करणारी कंपनी भारत बायोटेकने एक फॅक्ट शीट जारी केली आहे. ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे किंवा प्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो, अशी ओषधं घेत असतील त्यांनी अॅन्टी-कोविड लस कोवॅक्सीन टोचून न घेण्याचा सल्ला दिला जात आहे. यापूर्वी सरकारने सांगितलं होतं की, रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे रुग्ण ही लस घेऊ शकतात. मात्र पुढे अशी बाब समोर आली की अशा लोकांवर या लशीचा फारसा प्रभाव होणार नाही. त्याशिवाय किमोथेरेपी करणारे कर्करुग्ण, एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि स्टेरॉइड घेणारे लोक या श्रेणीत येतात. तसं पाहता या रुग्णांमध्ये कोरोनाचं संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक असतं. मात्र डॉक्टरांचं म्हणणं आहे की, सर्वसाधारणपणे या लोकांमध्ये लशीचा परिणाम अत्यंत नगण्य आहे.

हे ही वाचा- Corona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई

ताप, एलर्जी, गर्भवती...अशा लोकांनी लक्ष द्यावं.

भारत बायोटेकने ब्लीडिंग डिसऑर्डर असणाऱ्या लोकांना लस घेऊ नये असं आवाहन केलं आहे. याशिवाय जे गंभीर आजारी आहे, ताप असेल, एलर्जीची हिस्ट्री असेल, गर्भवती, बाळांना दूध देणाऱ्या महिलांनी लसीकरण करू नये.

कोवॅक्सीनने गंभीर वा एलर्जीक परिणाम होऊ शकतो?

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, देशभरात काही ठिकाणी लशीचे शुल्लक परिणाम समोर आल्यानंतर ही फॅक्टशीट तयार करण्यात आली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लस टोचणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते, मात्र संसर्ग गंभीर नसेल. कंपनीने सांगितलं की, भारत बायोटेक कोविड-19 लशीमुळे गंभीर एलर्जिक रिएक्शन होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. ते पुढे म्हणाले की, गंभीर परिणामात श्वास घेण्यास अडथळा, चेहरा व गळ्याभोवती सूज, ह्रदयाचे ठोके वाढणे आणि अशक्तपणा जाणवणे हे आहेत.

फॅक्ट शीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वॅक्सीनेटर अधिकाऱ्याला आपल्या आरोग्याच्या समस्यांविषयी नक्की सांगा. याशिवाय तुम्ही कोणत्या आजारावर औषधं घेत आहात, हेदेखील सांगा.

Published by: Meenal Gangurde
First published: January 19, 2021, 5:49 PM IST

ताज्या बातम्या