मराठी बातम्या /बातम्या /देश /आदिवासी महिलांनी बनवलेल्या साबणांना अमेरिकेतून मागणी, वाचा काय आहे याची किंमत आणि वैशिष्ट्यं

आदिवासी महिलांनी बनवलेल्या साबणांना अमेरिकेतून मागणी, वाचा काय आहे याची किंमत आणि वैशिष्ट्यं

महिलांनी बनवलेल्या आयुर्वेदिक आणि पूर्णपणे नैसर्गिक असलेल्या साबणांना (Soap) मोठी मागणी असून, आता या साबणांसाठी चक्क अमेरिकेतूनही (USA) ऑर्डर येत आहेत.

महिलांनी बनवलेल्या आयुर्वेदिक आणि पूर्णपणे नैसर्गिक असलेल्या साबणांना (Soap) मोठी मागणी असून, आता या साबणांसाठी चक्क अमेरिकेतूनही (USA) ऑर्डर येत आहेत.

महिलांनी बनवलेल्या आयुर्वेदिक आणि पूर्णपणे नैसर्गिक असलेल्या साबणांना (Soap) मोठी मागणी असून, आता या साबणांसाठी चक्क अमेरिकेतूनही (USA) ऑर्डर येत आहेत.

  खांडवा, 14 ऑगस्ट : भारतीय संस्कृती (Indian Culture), आयुर्वेद (Ayurveda), योग (Yoga) यांबद्दल पाश्चात्य देशांत पूर्वीपासूनच उत्सुकता आहे. अलीकडच्या काळात भारतीय पारंपरिक हस्तकला उत्पादनांसह आयुर्वेदिक उत्पादनं, योग यांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असून, भारतीय उत्पादनांना पाश्चात्य देशांतही मागणी वाढत आहे. विशेषत: महिला बचत गटांनी बनवलेल्या खास वस्तूंची ख्याती सातासमुद्रापार पोहोचली आहे. अशीच एक ख्याती मध्य प्रदेशातल्या (Madhya Pradesh) खांडवा (Khandwa) जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांची (Tribal Women) आहे. त्यांनी बनवलेल्या आयुर्वेदिक आणि पूर्णपणे नैसर्गिक असलेल्या साबणांना (Soap) मोठी मागणी असून, आता या साबणांसाठी चक्क अमेरिकेतूनही (USA) ऑर्डर येत आहेत.

  खांडवा जिल्ह्यातल्या पंधाना विधानसभा मतदारसंघातल्या उदयपूर गावात (Udaipur Village) राहणाऱ्या या महिला असून, त्यांनी शेळीच्या दुधापासून (Goat Milk) आणि इतर औषधी वनस्पतींपासून (Herbs) साबण बनवला आहे. विशेष म्हणजे या स्त्रिया दिवसभर सोयाबीनच्या शेतात काम करतात आणि संध्याकाळी हे साबण बनवतात. या साबणांची किंमत तब्बल 250 ते 350 रुपये आहे. हा साबण अनेक फ्लेव्हर्समध्येही उपलब्ध आहे. या साबणामध्ये वेगवेगळी सुगंधी तेलं, दार्जिलिंग चहाची पानं, आंबा, टरबूज इत्यादी गोष्टींचा वापर केला जातो. या साबणाचं पॅकिंगही पर्यावरणपूरक आहे. हा साबण ज्यूट पॅकेटमध्ये पॅक केला जातो.

  विमानप्रवास महागणार; देशांतर्गत विमान तिकीट दर वाढवण्याचा सरकारचा निर्णय

  उदयपूर गावात पुण्यातल्या तरुणाने हा साबण बनवण्याचा प्रकल्प सुरू केला. त्यासाठी प्रथम महिलांना साबण बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. सुरुवातीला त्यांची काही उत्पादनं अयशस्वी झाली, मात्र अखेर हा आगळावेगळा साबण बनवण्यात त्यांना यश आलं आणि आज हा साबण सातासमुद्रापार पोहोचला आहे. देशातल्या अनेक मोठ्या शहरांमध्येही या साबणाला मोठी मागणी आहे.

  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनीही या साबण बनवणाऱ्या महिलांची दखल घेतली असून, ट्वीट करून त्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. ‘उदयपूर गावातल्या बहिणींनी अनोखा आयुर्वेदिक साबण बनवून आपल्या यशाचा डंका अमेरिकेत गाजवला आहे. राज्याला तुमचा अभिमान आहे, असं म्हणत त्यांनी या महिलांचं अभिनंदन केलं आहे.

  First published:
  top videos