इंदूर, 30 मार्च : रामनवमीच्या दिवशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिरात छप्पर पडल्याने तब्बल 25 भाविक विहिरीत पडल्याची घटना समोर आली आहे. सध्या भाविकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. इंदूरच्या स्नेह नगरजवळील पटेल नगरमधील बेल्श्वर महादेव झुलेला मंदिरात रामनवमीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आल होते. त्या दरम्यान विहिरीवरील छप्पर अचानक कोसळले आणि तब्बल 25 जणं विहिरीत पडले. घटनेनंतर तातडीने तेथे मदतकार्य सुरू झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आज रामनवमीनिमित्त अनेक भाविक मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी छप्पर तुटलं आणि भाविक त्याखाली असलेल्या विहिरीत पडले. यानंतर अनेकांना बाहेर काढण्यात आलं, मात्र या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेश: इंदौर के पटेल नगर इलाके में झूलेलाल मंदिर की बावड़ी गिरने से कई लोगों के फंसे होने की आशंका है। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/sznYKWsjtf
— ANI_HindiNews (@AHindinews) March 30, 2023
पूजेदरम्यान झाला अपघात..
बेलेश्वर महादेव झुलेला मंदिरात पूजा सुरू होती. यादरम्यान अचानक 25 भाविक विहिरीत कोसळले. या घटनेनंतर तेथे गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. आणि त्यांनी विहिरीत पडलेल्या भाविकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
15 जणांना वाचवलं परंतू...
इंदूरचे कलेक्टर इलैया राजा टी यांनी सांगितलं की, बेलेश्वर महादेव झुलेला मंदिरात भाविक विहिरीजवळ पुजा करण्यासाठी जमा झाले होते. मात्र जास्त वजनामुळे विहीर खचली. आणि येथे उभे असलेले 25 लोक विहिरीत पडले. यात 15 जणांना वाचवण्यात आलं आहे आणि 4 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Indore News, Madhya pradesh