नवी दिल्ली 10 मार्च : देशभर रंगोत्सवाची धूम असताना दिल्लीत राजकीय वातावरण तापलं आहे. मध्यप्रदेशातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ते दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ज्योतिरादित्य हे सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. या आधीत मध्यप्रदेश सरकारमधल्या शिंदे समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. कर्नाटक नंतर आता मध्यप्रदेशमध्ये सत्तेचं नाट्य रंगलं आहे. आता या नाट्याला आज गंभीर वळण मिळालं आहे. कमलनाथ सरकारच्या तब्बल 22 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. एकाचवेळी 22 मंत्र्यांनी राजीनामे दिलेल्यामुळे काँग्रेस अडचणीत सापडले आहे. कर्नाटकमध्ये भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता काबीज केली. त्यानंतर भाजपने आपला मोर्चा मध्य प्रदेशकडे वळवला. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये मध्य प्रदेशच्या राजकारणात हालचालींना वेग आलाआहे. काँग्रेस सरकारमधले काही मंत्रीच बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचं बोललं जात आहे. तसंच, काँग्रेसचे 6 मंत्री आणि 11 आमदार बंगळुरूमध्ये असल्याचं बोललं जात आहे. या सर्वांचे फोन स्वीच ऑफ आहेत आणि ते कुठे आहेत याची अधिकृत माहिती अद्याप दिली गेलेली नाही. हे सर्व आमदार आणि मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असल्याचं बोललं जात आहे.
Breaking!!
— Pranay Upadhyaya (@JournoPranay) March 10, 2020
Congress leader @JM_Scindia meeting PM @narendramodi at 7LKM. Home Minister @AmitShah accompanied him. @INCIndia @BJP4India @BJP4MP pic.twitter.com/U1W1TBT74b
Delhi: Jyotiraditya Scindia leaves from his residence pic.twitter.com/dVDwgC0ulU
— ANI (@ANI) March 10, 2020
ज्योतिरादित्य शिंदेंची खेळी? मध्य प्रदेशात राजकीय संकट येऊ शकतं याची चिन्हं गेल्या काही दिवसांपासून दिसत होतं. मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता काबीज करणार अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच वेळी ज्योतिरादित्य शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येत होतं. पण, त्या वेळी ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना राज्याचं प्रमुखपद दिलं गेलं. ज्योतिरादित्य प्रदेश काँग्रेसच्या प्रमुखपदीसुद्धा कमलनाथच आहेत. आता हे पद ज्योतिरादित्य यांना देण्यात येऊ शकतं. पण शिंदे यांच्या नावाला कमलनाथ यांचा विरोध असल्याचं कळतं.
#Breaking-बीजेपी में शामिल हो सकते हैं ज्योतिरादित्य सिंधिया:सूत्र@farah17khan pic.twitter.com/Js0jda0Qfi
— News18 India (@News18India) March 10, 2020
दरम्यान, त्याच वेळी विरोधी पक्षांच्या हालचाली जोरदार सुरू झाल्या आहेत. मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटसची तयारी सुरू असल्याच्या चर्चा आतापासूनच सुरू झाल्या आहेत. त्यातच शिंदे कँपमधल्या मंत्र्यांच्या अचानक गायब होण्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान राज्यातल्या परिस्थितीची चर्चा करण्यासाठी कमलनाथ आज दिल्लीत सोनिया गांधी यांना भेटले. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर तातडीने मुख्यमंत्री कमलनाथ भोपाळला परतले. सरकार सुरक्षित राखण्यासाठीची रणनीती भोपाळमध्ये आखली जाईल, अशी काँग्रेस सूत्रांची माहिती आहे.

)







