मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुलीच्या लग्झरी घरात पैशांचा डोंगर, मात्र अर्पिता मुखर्जींच्या 50 वर्षीय आईचा जर्जर घरात निवारा

मुलीच्या लग्झरी घरात पैशांचा डोंगर, मात्र अर्पिता मुखर्जींच्या 50 वर्षीय आईचा जर्जर घरात निवारा

येथे झालेला शिक्षक भर्ती घोटाळा हा तब्बल 1000 कोटींचा असल्याचा दावा केला जात आहे.

येथे झालेला शिक्षक भर्ती घोटाळा हा तब्बल 1000 कोटींचा असल्याचा दावा केला जात आहे.

येथे झालेला शिक्षक भर्ती घोटाळा हा तब्बल 1000 कोटींचा असल्याचा दावा केला जात आहे.

    कलकत्ता, 30 जुलै : अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) अर्पिता मुखर्जी यांच्या लक्जरी घरांवर छापेमारी करण्यात आली. मात्र अद्यापही उत्तर 24 परगनामधील त्यांचे वडिलोपार्जित घरावर चर्चा झाली नाही. तेथे आर्पिता यांची आई मिनाती मुखर्जी राहतात. कलकत्तात बेलघोरियामध्ये त्या राहतात. त्या म्हणाल्या की, अर्पिता गेल्या आठवड्यात येथे आली होती. ती येथे फार काळ राहत नाही. ती अधिकतर आपल्याच घरी असते. इंडिया टुडेमधील बातमीनुसार, 50 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अत्यंत जर्जर घरात मिनाती मुखर्जी एकट्या राहतात. भर्ती घोटाळ्यात ईडीने अटक केली अर्पिता मुखर्जी आपल्या आजारी आईला भेटायलाही जात होती. त्यांच्यासोबत 2 ते 3 तास थांबत होती. शेजारच्यांनी सांगितलं की, अर्पिताने आईची काळजी घेण्यासाठी दोन सहाय्यकांची व्यवस्था केली होती. अर्पिताच्या आई पुढे म्हणाल्या की, जर तिने माझं ऐकलं असतं तर तिचं लग्न लावून दिलं असतं. तिचे वडील सरकारी सेवेत होते. म्हणून तिला ती नोकरी मिळू शकली असती. मात्र तिने याकडे लक्ष दिलं नव्हतं. तिने खूप आधीच घर सोडून दिलं होतं. तिला चित्रपट आणि टिव्हीवर काम करण्याची इच्छा होती. पश्चिम बंगालमध्ये उघड झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात अर्पिता मुखर्जीच्या अडचणीत वाढ झाली आहे. सापडलेली रक्कम मोजण्यासाठी ईडीला नोटा मोजण्याचे मशीन मागवले. आतापर्यंत ईडीने 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणात आतापर्यंत ईडीने 45 कोटींची रोकड जप्त केली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदेशी चलनही जप्त करण्यात आले आहे. मागच्या छाप्यात अर्पिताच्या घरातून 20 हून अधिक फोन आणि अनेक कंपन्यांचे कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, West bangal

    पुढील बातम्या