जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / लव्ह, सेक्स, धोखा : लग्नाचं आमिष दाखवून IAS अधिकाऱ्यानं MBBS तरुणीचं केलं लैंगिक शोषण

लव्ह, सेक्स, धोखा : लग्नाचं आमिष दाखवून IAS अधिकाऱ्यानं MBBS तरुणीचं केलं लैंगिक शोषण

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.  (File Photo)

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. (File Photo)

लव्ह, सेक्स आणि धोखा (Love, Sex And Dhokha) असं एक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीनं गुजरात केडरच्या आयएएस अधिकाऱ्यावर लग्नाच्या बहाण्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बुलंदशहर, 15 जून : महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतानाच दिसत आहेत. उच्च पदस्थ आणि उच्च शिक्षित लोकांकडूनही महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना समोर येत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. लव्ह, सेक्स आणि धोखा (Love, Sex And Dhokha) असं एक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीनं गुजरात केडरच्या आयएएस अधिकाऱ्यावर लग्नाच्या बहाण्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पीडित तरुणीनं आरोग्य विभागात संचालकपदावर असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. तरुणीच्या म्हणण्यानुसार, आयएएस अधिका्यानं तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती, जी तिने स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. हा आयएएस अधिकारी तिच्याशी फेसबुक मेसेंजरवरून चॅटिंग करत असायचा. नंतर त्यांची ही मैत्री पुढे जावून प्रेमात बदलली. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशमधील अलीगड जिल्ह्यात घडला आहे. आयएएस अधिकाऱ्यानं तरुणीला दिल्ली येथे नेऊन तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले आणि तिचे अश्लील फोटो देखील काढल्याचा आरोप आहे. पीडितेनं फोटो काढण्यास विरोध दर्शविला असता या आएएस अधिकाऱ्यानं तिच्याशी लग्नाची बतावणी केली. मात्र, प्रत्यक्षात हा अधिकारी विवाहित होता. त्याने पीडित मुलीशी त्याच्या अगोदरच्या लग्नाविषयी काहीही सांगितले नाही. आयएएस अधिका्यानं तरुणीशी लग्न केलं आणि दोघे एकत्र देखील राहू लागले आणि या तरुणीला एक मुलगी देखील झाली. यानंतर मात्र हा अधिकारी मुलगी आणि तरुणीला सोडून पळून गेला. हे वाचा -  ATM ट्रान्झेक्शनआधी कॅन्सल बटण दोन वेळा दाबल्यामुळे पिन चोरी होत नाही? वाचा काय आहे सत्य पीडित तरुणी आता आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून अनेकांना विनवण्या करत फिरत आहे. संबंधित अधिकाऱ्यामुळेच आपल्याला मुलगी झाली असून याचा पुरावा मिळावा म्हणून ती डीएनए चाचणीची मागणी करत आहे. या तरुणीनं न्यायासाठी राष्ट्रपतींना देखील पत्र लिहिलं आहे, तसेच न्याय मिळाला नाही तर इच्छामृत्यूची मागणी व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात