मराठी बातम्या /बातम्या /देश /

दहावीत मुलीला मिळाले 100 टक्के, तरी मुलीच्या आईला सतावली या गोष्टीची चिंता

दहावीत मुलीला मिळाले 100 टक्के, तरी मुलीच्या आईला सतावली या गोष्टीची चिंता

अंजली यादवला डॉक्टर बनायचे आहे. अंजलीला देशातील प्रमुख वैद्यकीय संस्था एम्स, दिल्लीमध्ये शिक्षण घ्यायचे आहे.

अंजली यादवला डॉक्टर बनायचे आहे. अंजलीला देशातील प्रमुख वैद्यकीय संस्था एम्स, दिल्लीमध्ये शिक्षण घ्यायचे आहे.

अंजली यादवला डॉक्टर बनायचे आहे. अंजलीला देशातील प्रमुख वैद्यकीय संस्था एम्स, दिल्लीमध्ये शिक्षण घ्यायचे आहे.

    चंडीगढ, 25 जुलै : नुकताच सीबीएसईचा निकाल लागला. यामध्ये हरयाणाच्या मुलीने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. हरियाणातील एका विद्यार्थिनीने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत तब्बल 100 टक्के गुण मिळवून राज्याचे नाव उंचावले आहे. मात्र, एकीकडे या विद्यार्थिनीची आई आपल्या मुलीच्या या निकालाने खूश होती. पण दुसरीकडे त्यांना एक चिंताही सतावत होती. अन् मिळाली आणखी एक आनंदाची बातमी - हरियाणाच्या महेंद्रगढ जिल्ह्यातील अंजली यादव या विद्यार्थिनीने राज्याचे नाव उंचावले आहे. मात्र, अंजलीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिच्या आईचा संघर्ष सुरू आहे. आणि आपल्या मुलीच्या पुढील शिक्षणाचा खर्च कसा उचलायचा, याची काळजी त्यांना होती. मात्र, रविवारी जेव्हा मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी यादव यांचे अभिनंदन करण्यासाठी फोन केला तेव्हा मुलीने त्यांना तिच्या आर्थिक अडचणींची माहिती दिली. हे ऐकून सीएम खट्टर यांनी तत्काळ विद्यार्थिनीला दरमहा 20,000 शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. अंजली यादवला डॉक्टर बनायचे आहे. अंजलीला देशातील प्रमुख वैद्यकीय संस्था एम्स, दिल्लीमध्ये शिक्षण घ्यायचे आहे. मात्र, तिची आई ही घरातील एकमेव कमावती सदस्य आहे. त्यांच्या कुटुंबाकडे जमिनीचा एक छोटा तुकडा आहे. पण अंजलीची आई उर्मिला यांनी सांगितले की, कुटुंबाच्या गरजा भागवण्याइतपत हे फारच कमी आहे. अंजलीचे वडील निमलष्करी दलात होते. मात्र, 2010 मध्ये त्यांचा भीषण अपघात झाला होता. यानंतर 2017 मध्ये त्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवेतून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण त्यांना सामान्य भविष्य निर्वाह निधीतून सुमारे 10 लाख रुपये मिळाले. अंजलीची आई उर्मिला यांनी सांगितले की, कुटुंबाचा खर्च भागवायला त्यांना संघर्ष करावा लागत आहे. तर अंजलीचा धाकटा भाऊ पाचवीत शिकतो. हेही वाचा - दोन मुलं आणि पतीचं निधन, धीर न सोडता घरातच सुरु केली शाळा; द्रोपदी मुर्मू यांचा खडतर प्रेरणादायी प्रवास अंजलीच्या आईने सांगितले की, त्यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्याचबरोबर शिष्यवृत्तीची घोषणा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभारी असल्याचे त्या म्हणाल्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: CBSE 10th, Chandigarh, Haryana

    पुढील बातम्या