सावधान! तुम्ही शिक्षण घेत असलेलं विद्यापीठ तर बोगस नाही ना? UGC कडून यादी जाहीर

सावधान! तुम्ही शिक्षण घेत असलेलं विद्यापीठ तर बोगस नाही ना? UGC कडून यादी जाहीर

UGC नं देशातील 24 स्वयंघोषित, मान्यता नसलेल्या बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर: महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेच्या काही दिवस आधीच विद्यापीठ अनुदान आयोगानं अर्थात UGC देशातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. UGC नं देशातील 24 स्वयंघोषित, मान्यता नसलेल्या बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. त्यात सर्वाधिक उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्लीतील विद्यापीठं आहेत. तर या यादीत महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश आहे.

हेही वाचा...उद्धव ठाकरे आणि आदित्य बिहारला जाणार? शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

सध्या देशात स्वयंघोषित व कोणतीही वैधानिक मान्यता नसलेली २४ विद्यापीठे कार्यरत आहेत. 'यूजीसी' कायद्याचे उल्लंघन करून सुरू असलेली ही विद्यापीठे बनावट असल्याचे घोषित करण्यात येत असून, त्यांना कोणत्याही प्रकारची पदवी देण्याचे अधिकार नाहीत', असे 'यूजीसी'चे सचिव रजनीश जैश यांनी सांगितले. या बनावट विद्यापीठांपैकी सर्वाधिक आठ उत्तर प्रदेशमध्ये आहेत, तर दिल्लीत अशी सात विद्यापीठे कार्यरत आहेत, असं UGC नं विद्यार्थी व नागरिकांना सूचित केलं आहे.

कोणत्या आहेत बोगस विद्यापीठ...?

कमर्शियल यूनिवर्सिटी लिमिटेड, दरियागंज, दिल्ली

युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, दिल्ली

व्होकेशनल यूनिवर्सिटी, दिल्ली

एडीआर सेंट्रिक जूरीडिकल यूनिवर्सिटी, एडीआर हाउस, राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ साइंस अँड इंजीनियरिंग, नवी दिल्ली

विश्वकर्मा ओपन यूनिवर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, संजय एन्क्लेव, नवी दिल्ली

आध्यात्मिक विश्वविद्यालय (स्पिरिचुअल युनिवर्सिटी), रोहिणी, दिल्ली

बडागानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिवर्सिटी एजुकेशन सोसायटी, बेलगाम, कर्नाटक

सेंट जॉन युनिवर्सिटी, किश्नात्तम, केरळ

राजा अरेबिक युनिवर्सिटी, नागपूर, महाराष्ट्र

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन, चौरंगी रोड, कोलकाता, पश्चिम बंगाल

इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन अँड रिसर्च, कोलकाता, पश्चिम बंगाल

वारणसेय संस्कृत विश्वविद्यालय, वाराणसी,

महिला ग्राम विद्यापीठ (विमेंस युनिवर्सिटी), प्रयागराज, उत्तर प्रदेश

गांधी हिन्दी विद्यापीठ, प्रयागराज, उत्तर प्रदेश

हेही वाचा..मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र! महिला अत्याचारांत पहिल्या क्रमाकांवर महाराष्ट्र

नॅशनल यूनिवर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर, उत्तर प्रदेश

नेताजी सुभाष चंद्र बोस युनिवर्सिटी (ओपन युनिवर्सिटी), अलीगढ, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश विश्वविद्यालय, मथुरा, उत्तर प्रदेश

महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्वविद्यालय, प्रतापगढ, उत्तर प्रदेश

इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद, नोएडा, उत्तर प्रदेश

नव भारत शिक्षा परिषद, राउरकेला, ओडिशा

नॉर्थ ओडिशा यूनिवर्सिटी ऑफ एग्रीकल्चर एंड टेक्नोलॉजी, मयूरगंज, ओडिशा

श्री बोधि एकेडमी ऑफ हायर एजुकेशन, पुद्दुचेरी

क्राइस्ट न्यू टेस्टमेंट डीम्ड यूनिवर्सिटी, गुंटूर, आंध्र प्रदेश

Published by: Sandip Parolekar
First published: October 8, 2020, 3:27 PM IST

ताज्या बातम्या