नवी दिल्ली, 21 जुलै: सध्या जगभरात कोरोना व्हायरसचं (Corona virus) संकट आहे. या संकटात अनेक मुलांनी आपले आई-वडिलांना गमावलं आहे. त्यामुळे जगात बरीच मुलं अनाथ झाली आहेत. भारतात 1 लाख 19 लाख हजार मुलं अनाथ झालीत. जगभरातील अनाथ (Orphan) झालेल्या मुलांची संख्या 15 लाखांच्यावर आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात 15 लाखांहून अधिक मुलांनी कमीत कमी आईवडील, आजी- आजोबा यांना गमावलं आहे.
द लांसेटमध्ये यासंदर्भातली माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. संशोधनानुसार, महामारीच्या पहिल्या 14 महिन्यांत दहा लाखाहून अधिक मुलांच्या आई- वडिलांपैकी एक किंवा दोघांचा मृत्यू झाला आहे. अशाच प्रकार उर्वरित 5 लाख मुलांनी त्यांच्या घरात राहणाऱ्या आजी-आजोबाचाही मृत्यू झालेला पाहिला आहे.
मुलं अनाथ होण्याचा आकडा वाढला
मार्च 2021 मध्ये भारतात सुमारे 5,091 मुलं अनाथ झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. तर एप्रिल 2021 मध्ये नव्याने अनाथ मुलांच्या संख्येत वाढ होऊन आता तो आकडा 43,139 वर पोहोचला आहे. म्हणजेच नव्याने अनाथ मुलांचे प्रमाण 8.5 पटींनी वाढले आहे. ज्या मुलांचे पालक किंवा पालनपोषण करणाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
सचिन वाझेमुळे 5 महिने टळली राज कुंद्राची अटक, नाहीतर...
टीमनं मार्च 2020 ते एप्रिल 2021 या कालावधीत 21 देशांचा कोरोना मृत्यूदर आणि राष्ट्रीय जननक्षमतेच्या आकडेवारीवर अंदाज लावले आहेत. दक्षिण आफ्रिका, पेरु, संयुक्त राज्य अमेरिका, भारत, ब्राझिल आणि मेक्सिको या देशात सर्वाधिक अनाथ झालेल्या मुलांची संख्या आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.