मराठी बातम्या /बातम्या /देश /गेम ऑफ थ्रोन्सहून अधिक रंजक आहे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, क्षणाक्षणाला नवं सरप्राइज

गेम ऑफ थ्रोन्सहून अधिक रंजक आहे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, क्षणाक्षणाला नवं सरप्राइज

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे नवी दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयातील वातावरण बदललं आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे नवी दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयातील वातावरण बदललं आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे नवी दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयातील वातावरण बदललं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे नवी दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयातील वातावरण बदललं आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या निवडणूक कार्यालयात सध्या आवाज अन् गडबड गोंधळ पाहायला मिळत आहे. या कार्यालयात दोन अतिरिक्त टेबलांसह नव्या स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. हा स्टाफ निवडणूक लढण्यास इच्छूक असणाऱ्या नेत्यांचं मार्गदर्शन करणार आहे. ऑक्टोबर महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आयोजित करण्यात आली आहे.

शशी थरूर यांनी निवडणुकीचा फॉर्म घेतल्यानंतर कार्यालयातील वातावरणच बदललं. त्यांनी काँग्रेसच्या सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्रींसह फोटोदेखील क्लिक केले. यामुळे तेदेखील राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याची पुष्टी झाली.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक या 5 लोकांच्या खांद्यावर! कशी आहे प्रोसेस? यादी जाहीर करण्यास का दिला नकार

सोनिया गांधी म्हणाल्या...

मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी यापूर्वीच सांगितलं आहे की, त्या या निवडणुकीत तटस्थ राहतील आणि पक्षातील कोणताही सदस्य निवडणूक लढवू शकतो. पक्षात शशी थरूर वेगळेच दिसतात. ते उच्च शिक्षित आहेत. अनेकदा ते पक्षाच्या लाइनरही फिट बसत नाहीत. मात्र तरीही ते तिरुवनंतपूरमची सीट जिंकले. थरूर काँग्रेसचा विद्रोही ग्रूप G-23 चा भाग होते.

काँग्रेसमध्ये निवडणुकीचे वारे, शशी थरूरना कोण देणार आव्हान? दिल्लीत घडामोडींना वेग

मनीष तिवारी आणि अन्य नेतेही मैदानात...

थरूर यांच्याप्रमाणे खासदार मनिष तिवारीदेखील पार्टी विद्रोही आहेत. म्हटलं जातं की, गांधी कुटुंबीयांशी यांचे संबंध फारसे चांगले नाही. सध्या मनिष तिवारी पंजाबमधील आपलं विधानसभेच्या दौऱ्यावर आहेत. कोणकोणते नेते त्यांचे समर्थक करू शकतील, याचा चाचपणी ते करीत आहेत. गांधी कुटुंबाचे जवळचे मल्लिकार्जून खर्गे देखील राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या मैदानात आहे. खर्गेनी जर निवडणूक लढवली तर त्यांना बरीच मतं मिळू शकतात. त्यांचे पक्षातील नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. या रांगेत मुकुल वासनिकदेखील आहे. मुकुल हे महाराष्ट्रातील दलित नेते आहेत. सध्या ते गांधी कुटुंबायाच्या जवळचे मानले जातात. या नेत्यांप्रमाणे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, भूपिंदर सिंग हुड्डा, पृथ्वीराज चव्हाणदेखील पक्षाच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत सामील आहेत.

First published:
top videos

    Tags: Delhi, Election, Shashi tharoor